गेल्या काही दिवसांपासून चीन आणि तैवान यांच्यामधील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. चीनकडून सातत्याने तैवान हा चीनचाच भाग असल्याचे दावे केले जात आहेत. तसेच, चर्चेतून मार्ग न निघाल्यास बळाचा वापर करून तैवानवर ताबा मिळवण्याचा निर्धार चीनी प्रशासनाकडून बोलून दाखवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे तैवाननं देखील स्वसंरक्षणासाठी सज्ज असल्याचं जाहीर केलेलं असताना आता या वादात जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातली महासत्ता होण्यासाठीची स्पर्धा सर्वश्रुत आहेच. मात्र, आता तैवान प्रकरणावरून हे दोन्ही देश प्रत्यक्ष युद्धमैदानात समोरासमोर उभे ठाकण्याची भिती निर्माण झाली आहे.

चीन आक्रमणासाठी सज्ज – तैवान

काही दिवसांपूर्वीच तैवानकडून चीन आक्रमणासाठी सज्ज असल्याचा इशारा देण्यात आला होता. तैवानचे तैवानचे संरक्षण मंत्री चियू कुओ चेंग यांनी तैवानच्या संसदेत बोलतानाच यासंदर्भात गंभीर शब्दांमध्ये चीनी आक्रमणाची भिती बोलून दाखवली होती. गेल्या ४० वर्षांमध्ये चीनसोबत सर्वाधिक तणावाचं वातावरण सध्या निर्माण झाला असून कोणत्याही क्षणी आक्रमण करण्यासाठी चीन सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्या दृष्टीने तैवाननं देखील तयारी सुरू केली असून स्वसंरक्षणासाठी तैवान तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

israeli strikes on rafah kill 18 as gaza death toll tops 34000
इस्रायलच्या राफावरील हल्ल्यात १८  ठार
Iran Israel conflict wrong us policy worsening the west asia situation
अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन

जो बायडेन यांनी चीनला भरला दम!

दरम्यान, यानंतर देखील चीनकडून सातत्याने तैवानवर ताबा मिळवण्याच्या दृष्टीने सूचक वक्तव्य केली जात असताना अमेरिकेनं या वादात उडी घेत थेट चीनलाच सज्जड दम भरला आहे. “चीनकडून जर तैवानवर आक्रमण करण्यात आलं किंवा तैवानचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, तैवानचं सार्वभौमत्व धोक्यात आलं, तर आमेरिका तैवानच्या संरक्षणासाठी चीनविरोधात उभी ठाकेल. आमची ती बांधीलकी आहे”, अशा स्पष्ट शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनला इशारा दिला आहे.

दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती देताना व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी तैवान रिलेशन्स अॅक्टची आठवण करून दिली. “अमेरिकेचे तैवानसोबत असलेले लष्करी संबंध हे तैवान रिलेशन्स अॅक्टनुसारच कायम राहणार आहे. या करारानुसार आम्ही आमचं कर्तव्य निभावू, आम्ही तैवानला त्यांच्या स्वसंरक्षणात मदत करत राहू”, असं व्हाईटहाऊसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

“चीन हल्ल्यासाठी पूर्णपणे सज्ज, २०२५मध्ये…”, तैवाननं दिला गंभीर इशारा!

चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर

दरम्यान, अमेरिकेनं चीनला इशारा दिलेला असताना चीनने देखील अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध, शांतता आणि स्थैर्याला धक्का लावायचा नसल्यास अमेरिकेने तैवानला अशा प्रकारे कोणताही चुकीचा संदेश देऊ नये”, असं चीनकडून अमेरिकेला सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन आता आमनेसामने उभे ठाकणार का, याची चर्चा आंतरराष्ट्रीय विषयांच्या जाणकारांमध्ये सुरू झाली आहे.