अमेरिकन एक्स्प्रेस या क्रेडिट कार्ड  कंपनीचे अध्यक्ष एड गिलिगन यांचे शुक्रवारी व्यावसायिक दौऱ्याहून न्यूयॉर्कला परतत असताना विमान प्रवासात निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि चार मुले असा परिवार आहे.
गिलिगन विमान प्रवासात असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. विमान तातडीने उतरवण्यात आले. पण गिलिगन यांचे निधन झाले होते. असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
गिलिगन यांचे झालेले अकस्मात निधन धक्कादायक आणि क्लेशकारक आहे. त्यांच्याबरोबर काम करणे हे मोठे भाग्य होते, अशा शब्दांत कंपनीचे मुख्याधिकारी केन शेनॉल्ट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गिलिगन यांनी ३५ वर्षांपूर्वी कंपनीत क्रेडिट कार्ड वितरक म्हणून कामास सुरुवात केली आणि कंपनीच्या बहुतेक सर्व शाखांचा अनुभव घेत आपल्या कर्तृत्वावर ते अध्यक्षपदी पोहोचले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American express president dies
First published on: 31-05-2015 at 03:47 IST