Americans Can not Compete US Expert warns of India-China-Russia alliance Trump tariff : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतीय मालावर ५० टक्के टॅरिफ लादल्याने भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे रशिया आणि चीन या देशांबरोबरचे संबंध अधिक मजबूत होताना दिसत आहेत. यामुळे अमेरिकेतील अनेक राजकीय विश्लेषक ट्रम्प प्रशासनावर टीका करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे आता नवी दिल्ली ही मॉस्को आणि बिजिंगच्या जवळ जात आहे आणि यामुळे भारत-चीन-रशिया ही शक्तीशाली आघाडी तयार होण्याचा धोका अमेरिका पत्करात आहे, असा इशारा एका वरिष्ठ अमेरिकन विश्लेषकाने दिला आहे. “चिनी, रशियन आणि भारतीय हे जर कोणत्याही स्वरूपातील आर्थिक आणि काही प्रमाणात लष्करी आघाडीत एकात्र आले, तर अमेरिकन लोकांना २१व्या शतकात स्पर्धा करणे शक्यच होणार नाही. कदाचित आपल्यालाही घरी जावे लागेल,” असे एनवाययूचे वरिष्ठ नॉन-रेसिडेंट फेलो एड प्राइस म्हणाले आहेत.
एड प्राइस यांनी यांनी युक्तीवाद केली की वॉशिंग्टनच्या दंडात्मक धोरणामुळे भारताकडे खूप कमी पर्याय शिल्लक राहिले होते, ते म्हणाले की, जर तुम्ही भारतावर ५० टक्के टॅरिफ लादणार असाल, तर भारत दुसरे व्यापार भागितार शोधेल. भारत एससीओ परिषदेत का असेल किंवा पंतप्रधान मोदी तिथे का आहेत हे समजून न घेण्याचा दिखावा करण्याला काहीही तर्क उरत नाही. का ते आम्हाला माहित आहे . आम्हाला माहिती आहे की अमेरिका जी बहुराष्ट्रीय व्यापार संघटना होती तिला एकतर्फी आकार देत आहे. अखेर यातून फायदा घेऊ शकतो असा एकमेव देश हा चीन आहे.”
मोदींनी घेतली जिनपिंग आणि पुतिन यांची भेट
काही दिवासांपूर्वी चीनमधील तियानजिन येथे आयोजित केलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ायंनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या भेटींचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर हे विधान करण्यात आले आहे. या परिषदेचे यजमानपग शी जिनपिग यांनी भूषवले होते आणि ही आजवरची सर्वात मोठी परिषद होती. यामध्ये १० सदस्य देश आणि २० आमंत्रित नेते सहभागी झाले होते.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतीय मालावर २५ टक्के व्यापारी शुल्क लादले आणि त्यानंतर रशियन तेल खरेदी करत अस्लयाचे सांगून अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्यात आले. यामुळे भारतीय मालावर जगातिल सर्वाधिक म्हणजेच ५० टक्के टॅरिफ लादण्यात आला. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध सध्या ताणले गेले आहेत.