scorecardresearch

Premium

चेन्नईमध्ये आढळली तारीख उलटून गेलेल्या दुधाची ५ हजार पाकिटं, समोर आलं नेमकं कारण!

तामिळनाडूत आलेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे तेथील नागरिकांची दाणादाण उडाली होती. जनजीवन विस्कळीत झाले होते. तसंच, अनेक वस्तूंचा तुटवडा झाला होता.

Avani milk
तामिळनाडूत सापडली दुधाची पाकिटे (फोटो – एक्स्प्रेस फोटो)

मिचौंग चक्रीवादळामुळे तमिळनाडूमध्ये हाहाकार माजला होता. अवकाळी पावसामुळे तिथं पूरस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर चेन्नईतील तांबरमजवळील कालव्यात अवनी दुधाची ५ हजार पाकिटे सापडली आहेत. अवनी दूध चेन्नईतील स्थानिक उत्पादन आहे. सापडलेल्या दुधाच्या पॅकेटवर ४ डिसेंबर अशी एक्सापायरी तारीख नोंदलेली आहे. इंडियन एक्स्पेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

तमिळनाडूत आलेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे तेथील नागरिकांची दाणादाण उडाली होती. जनजीवन विस्कळीत झाले होते. तसंच, अनेक वस्तूंचा तुटवडा झाला होता. दूधाचीही कमतरता जाणवत होती. अनेकांनी दूध चढ्या भावाने विकले. त्यामुळे याच्या तक्रारीही आल्या होत्या. तर, तांबरमजवळील एका लहान कालव्यात दुधाची पाकिटे सापडली आहेत. या पाकिटांवर ४ डिसेंबर ही एक्सपायरी डेट आहे.

Three Bangladeshi nationals residing in Vikroli arrested
विक्रोळीत वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना अटक
Loksatta anvyarth in West Asia Fierce conflicts Israel Hamas conflict
अन्वयार्थ: जीवघेणा आडमुठेपणा
Ulta-Chashma
उलटा चष्मा: एका ‘न झालेल्या’मृत्यूची मृत्युघंटा..
A dead body of a leopard was found in Sangli Rethere area
पंजा,नखे गायब झालेल्या बिबट्याचा मृतदेह आढळला

तमिळनाडू दूध उत्पादक सहकारी संस्था संचालकांनी स्पष्ट केले, एविन शहर आणि आसपासच्या भागात दररोज १५ लाख लिटर दूधाचे वितरण केले जाते. याशिवाय इतर जिल्ह्यातून ६,६०० किलोहून अधिक दूध पावडरचा पुरवठा केला जातो.

चक्रीवादळ Michaung मुळे उद्भवलेल्या व्यत्ययामुळे दुधाचे वितरण प्रभावित झाले आहे. यामुळे अतिरिक्त पुरवठ्याची विल्वेवाट लावण्यात आली आहे. दुधाच्या पाकिटांचं योग्य वितरण न झाल्याने शहरात टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, तामिळनाडूचे दूध आणि दुग्धविकास मंत्री मनो थंगराज म्हणाले, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी खाजगी दूध पुरवठादारांना संपूर्ण दूध पुरवठा वाढवण्याचे आवाहन केले आहे.

तांबरम महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, मिचौंग चक्रीवादळामुळे पालिकेकडून मदत आणि पुनर्वसन प्रक्रिया राबवली जात आहे. ज्या क्षेत्रात दुधाची पाकिटे सापडली, ते क्षे्र झोन ४ अंतर्गत येते. येथे मदत उपायांसाठी मध्यवर्ती एजंट नेमले नव्हते. तसंच, मदत म्हणून सरकारने केवळ जांभळ्या पॅकेटचे वितरण करण्यास सांगितले होते. परंतु, येथे आढळेली दुधाची पाकिटे ही आरोक्या, हातसून या ब्रॅण्ड्सचीही सापडली आहेत. या पॅकेट्सची मुदत ४ डिसेंबरपर्यंत होती.

४ डिसेंबर रोजी चक्रीवादळ मिचौंगमुळे मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता . अनेक किरकोळ दुकाने आणि सुपरमार्केट ४ डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात आले होते आणि ज्या विक्रेत्यांना त्यांच्या ताब्यातील दुधाची पाकिटे विकता आली नाहीत त्यांनी ती कालव्यात टाकली असण्याची शक्यता होती, असंही पालिकेने एका निवेदनात म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amid post cyclone milk shortage in chennai discarded packets found in canal sgk

First published on: 11-12-2023 at 09:36 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×