राजनाथ सिंह यांनी केंद्रीय गृहखात्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर, आता भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्याच्या हालचालींना दिल्लीत वेग आला आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी बुधवारी सरसंघचालक मोहन भागवत आणि संघातील अन्य प्रमुख नेत्यांची भेट घेतली. मोहन भागवत आणि राजनाथ सिंह यांच्यातील बैठकीदरम्यान भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासंदर्भात चर्चा झाली. अध्यक्षपदासाठी पक्षाचे सरचिटणीस जे.पी. नड्डा, अमित शहा आणि अरूण माथूर यांच्या नावांचा विचार सुरू असून, त्यापैकी जे.पी. नड्डा यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. मोहन भागवतांबरोबर झालेल्या चर्चेनंतर राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीसुद्धा भेट घेतली. दरम्यान या चर्चेला संघाचे सरकार्यवाह सुरेश सोनीसुद्धा उपस्थित होते. भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात पदभार स्विकाल्यामुळे, आगामी काळात पक्षात मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2014 रोजी प्रकाशित
भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
राजनाथ सिंह यांनी केंद्रीय गृहखात्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर, आता भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नेमण्याच्या हालचालींना दिल्लीत वेग आला आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी बुधवारी सरसंघचालक मोहन भागवत आणि संघातील अन्य प्रमुख नेत्यांची भेट घेतली.

First published on: 28-05-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amid talks of leadership change in bjp rajnath singh meets sangh leaders