पीटीआय, जगदलपूर

काँग्रेस नक्षलवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केला, तसेच नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात नक्षली हिंसाचाराच्या घटना ५२ टक्क्यांनी कमी झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी छत्तीसगडचे रूपांतर ‘काँग्रेससाठी एटीएममध्ये’ केले असल्याचा दावा करतानाच, राज्यातील काँग्रेसची राजवट म्हणजे ‘घोटाळय़ांचे सरकार’ असल्याचे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या छत्तीसगडमधील जगदलपूर व कोंडागाव येथे प्रचारसभांना संबोधित करताना शहा यांनी राज्यात भाजपला सत्तेवर आणण्याचे आवाहन लोकांना केले आणि आपला पक्ष संपूर्ण राज्याला नक्षलवादाच्या धोक्यापासून मुक्त करेल असे आश्वासन दिले.‘राज्यात भाजपला पुन्हा एकदा सत्तेवर आणण्याचे आवाहन तुम्हाला करण्यासाठी मी आज आलो आहे. घोटाळे करून आदिवासींचा पैसा ज्यांनी लुटला आहे त्यांना आम्ही उलटे टांगू’, असेही शहा म्हणाले.छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आला, तर केंद्राने राज्याच्या विकासासाठी पाठवलेला पैसा ‘‘काँग्रेसच्या एटीएम मार्फत’ दिल्लीला वळवला जाईल’’, असा दावा शहा यांनी केला.