भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या अलीकडेच उत्तर प्रदेशात ज्या जाहीर सभा झाल्या त्या ‘सामना निश्चित’ केल्याप्रमाणे होत्या, असा आरोप केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केला आहे. मोदी यांचे विश्वासू सहकारी अमित शहा दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत असून दोन्ही नेत्यांनी जाहीर सभांमधून केलेली भाषणेही अमित शहा यांनीच लिहिली होती, असेही वर्मा यांनी म्हटले आहे. वाराणसी आणि गोरखपूर येथे झालेल्या जाहीर सभांमधून एकमेकांशी कलगीतुरा झाल्याचे चित्र मोदी आणि यादव यांनी रंगविले, असेही वर्मा यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.