Amity student slapped over 50 times Viral Video : ॲमिटी विद्यापीठातील एका विद्यार्थ्याला लखनौ कॅम्पसमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या विद्यार्थ्याला त्याच्याबरोबर शिकणारे काहीजण वारवार कानशिलात लगावताना आणि शिवीगाळ करताना पाहायला मिळत आहेत.

ही घटना २६ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये घडली असून या घटनेतील पीडित व्यक्तीचे नावी शिखर मुकेश केसरवानी असे आहे. तो त्यांच्या मित्राच्या वाहनातून विद्यापीठात आला होता.

या प्रकरणात पाच विद्यार्थ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, आयुष यादव, जान्हवी मिश्रा, मिलय बॅनर्जी, विवेक सिंह आणि आर्यमान शिक्ला अशी या पाच जणांची नावे आहेत. यासंबंधीचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की कारच्या पुढच्या सीटवर बसलेली एक विद्यार्थीनी मागच्या सीटवर बसलेल्या शिखरला वारंवार थप्पड मारत आहे. मात्र या व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळता आलेली नाही.

जी महिला विद्यार्थीनी शिखरला वारंवार मारत आहे ती त्याला थप्पड मारतेवेळी त्याचे हात खाली घेण्यास सांगत आहे. ती शिखरला विचारते की, “क्या बोला था तूने? कॅरेक्टर? कॅरेक्टर?” आणि त्याला आणखी काही थप्पड लगावते. तर यादरम्यान आणखी एका विद्यार्थी मध्ये येतो आणि शिखरला दम भरतो त्याला हाथ खाली करायला सांगतो.

इतर आयुष म्हणून बोलत अशल्याल्या विद्यार्थ्याने नंतर शिखरला थप्पड मारायला सुरुवात केली. तो वारंवार शिखरला हात खाली ठेव असे सांगत होता. शिखरने चेहरा झाकण्यासाठी वर केलेला हात थप्पड मारण्यासाठी बाजूला करत असल्याचेही व्हिडिओत दिसते आहे. हा व्हिडीओ १०१ सेकंदांचा आहे.

घटना उजेडात आल्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या वडिलींनी मुकेश केसरवानी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केली आहे की, त्यांनी आरोप केला की बी.ए. एलएलबीच्या दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी असलेला त्यांचा मुलगा या घटनेनंतर मानसिक धक्क्यात गेला असून सध्या महाविद्यालयात जात नाही, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.