अनिल अंबानींनी आपल्या मुलाची ओळख गुंतवणूकदारांना करून देताना सांगितलं होतं की, अनमोल संचालक मंडळावर आल्यापासून नशीबाचे फासे आपल्या बाजुने पडायला लागले आहेत. विशेषत: रिलायन्स कॅपिटलवर तर नशीबाची खूपच मेहेरनजर आहे. अनिल अंबानींचे बोल खरे ठरत असल्याचे दिसून येत आहे. अनमोलनी केलेल्या पहिल्याच व्यवहारात रिलायन्स कॅपिटल समूहाला मूळ गुंतवणुकीच्या 25 पट जास्त नफा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनमोल 2016 मध्ये संचालक म्हणून रिलायन्स कॅपिटलमध्ये रुजू झाला. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार अनमोल अंबानींनी रिलायन्स समूहाचा कोडमास्टर्स या कंपनीतला 60 टक्के हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांना विकला आहे. कोडमास्टर्स ही इंग्लंडमधली गेम डेवलप करणारी कंपनी आहे. या कंपनीचे 90 टक्के शेअर्स रिलायन्सने 2009मध्ये 100 कोटी रुपयांना विकत घेतले होते. नुकत्याच झालेल्या व्यवहारामध्ये अनमोलने या कंपनीतील 60 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना त्यानं हे शेअर्स 1700 कोटी रुपयांना विकले. दहा वर्षापूर्वी ज्या 60 टक्के शेअर्ससाठी रिलायन्सने 66.67 कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्याचे आता 1700 कोटी रुपये म्हणजे 25 पट झाले आहेत. रिलायन्सकडे अजून कोडमास्टर्सचे 30 टक्के शेअर्स आहेत ज्याचं मूल्य 850 कोटी रुपये आहे.

फॉर्म्युला वन सारखे रेसिंग गेम डेवलप करण्यात ही कंपनी जागतिक स्तरावर अग्रस्थानी आहे. कोडमास्टर्सचे सीईओ फ्रँक सॅगनीर यांच्याकडे 10 टक्के शेअर्स आहेत. या कंपनीची पाच ठिकाणी कार्यालये आहेत, तीन इंग्लंडमध्ये, एक कौलालंपूरमध्ये व एक पुण्याला. इंग्लंड व युरोपमधल्या एकूण 30 संस्थात्मक गुंतवणूकदारांना 60 टक्के शेअर्स विकण्यात आले आहेत.

लवकरच कोडमास्टर्सची नोंदणी लंडन स्टॉक एक्स्चेंजमध्ये करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोडमास्टर्सचे उत्पन्न 31 दशलक्ष पौंडांवरून दुपटीनं वाढून 64 दशलक्ष डॉलर्स झाले आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाची हॉलीवूडमधल्या ड्रीमवर्क्स या फिल्म स्टुडिओमध्येही गुंकवणूक आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anmol ambanis first deal brings 25 times profit to anil ambanis reliance group
First published on: 31-05-2018 at 14:48 IST