भारतीय वायू दलासाठी आवश्यक असलेल्या एअरबसचे तंत्रज्ञान असलेल्या सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी अखेर बडोद्यात केली जाणार आहे. संरक्षण विभागाचे सचिव अजय कुमार यांनी याबाबतची घोषणा आज केली आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या ३० ऑक्टोबरला होणार असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. एअरबस कंपनीची ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ आणि टाटाची ‘ टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड’हे संयुक्तरित्या बडोद्यात सी-२९५ या मालवाहू विमानांची निर्मिती करणार आहेत. यानिमित्ताने आणखी एक मोठा प्रकल्प हा गुजरातमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… विश्लेषण: आता खरंच ‘नो टेन्शन’! तणावातही आनंदी ठेवते डेन्मार्कची लोकप्रिय ‘Hygge’ पद्धत; नेमकं हे घडतं कसं?

४ ते १० टन पर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली एकूण ५६ सी-२९५ मालवाहू विमाने घेण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. यानुसार एअरबस, टाटा आणि भारतीय वायू दलात तब्बल अडीच अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २१ हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे. यानुसार एअरबस १६ मालवाहू विमाने ही थेट तयार करुन देणार आहे. तर उर्वरित ४० मालवाहू विमानांची निर्मिती आता बडोद्यात केली जाणार आहे.

हेही वाचा… Indian Currency Note: नोटांवर आधी गांधीजींचा फोटो नव्हताच; वाचा नेमका काय आहे भारतीय चलनाचा इतिहास! कशा छापल्या जातात नोटा!

सध्या भारतीय वायू दलात असलेल्या, जुन्या तंत्रज्ञानाच्या एचएस ७४८ Avro या मालवाहू विमानांची जागा सी-२९५ ही मालवाहू विमाने घेतील. पॅराट्रुपर्स आणि सैन्य दलासाठी आवश्यक सामानाची वाहतूक करण्याकरता या मालवाहू विमानांचा उपयोग होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another mega project in gujarat air force c295 cargo planes will be built in baroda asj
First published on: 27-10-2022 at 19:08 IST