Pakistan President News: पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना पदावरून हटवण्याच्या शक्यतेने आणि वाढत्या बंडखोरीच्या अटकळींमुळे देशातील राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची जागा घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत. मात्र, हे सत्तांतर स्वेच्छेने होणार की सक्तीने, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

बिलावल भुट्टो झरदारी यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जनरल असीम मुनीर यांच्यावर उघडपणे टीका केल्यानंतर तणाव वाढला आहे. त्यांनी हाफिज सईद आणि मसूद अझहर यांना भारताच्या ताब्यात देण्यास कोणताही आक्षेप नसावा, असे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

बिलावल भुट्टो यांच्या या वक्तव्यामुळे हाफिज सईदच्या मुलाने जाहीर स्पष्टीकरण दिले. यानंतर पाकिस्तानच्या राजकीय आणि सुरक्षा वर्तुळात नवीन वादविवाद सुरू झाले. तेव्हापासून समाजाच्या विविध स्तरांमध्ये सत्तापालटाविरुद्धच्या भावना निर्माण होऊ लागल्या आहेत.

इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी पत्रकार सय्यद यांनी दावा केला आहे की जनरल असीम मुनीर राष्ट्रपतीपद स्वीकारण्यासाठी पडद्यामागे डावपेच आखत आहेत. याशिवाय, या राजकीय नाट्यात शरीफ कुटुंबाच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारण यातील त्यांचा सहभाग अद्याप अस्पष्ट आहे.

याबाबत शेहबाज शरीफ सरकार किंवा लष्कराकडून अधिकृत स्पष्टीकरण न मिळाल्याने राष्ट्रपती झरदारी यांचे भवितव्य अनिश्चित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी नुकतेच राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना पदावरून हटवण्यात येणार असल्याच्या अफवा ठामपणे फेटाळून लावल्या आहेत. “पहिल्यांदाच राजकीय नेते, सरकार आणि लष्करी संस्था एकत्र आले आहेत आणि याचा काही लोकांना त्रास होत आहे,” असे नक्वी यांनी सुक्कूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.