राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणारी महिला पहिलवान अंशू मलिकने आता बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. कुस्तीच्या मैदानात एका पाठोपाठ एक आरोपांची दंगल यामुळे पाहण्यास मिळते आहे. एवढंच काय अंशूने असंही म्हटलं आहे की मलाच नाही तर प्रत्येक मुलीला चुकीचं वाटेल असं वर्तन बृज भूषण सिंह यांचं आहे.

काय म्हटलं आहे अंशू मलिकने?

भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह हे जेव्हा स्पर्धा असताना शिबीरांमध्ये येतात तेव्हा प्रत्येक महिला पहिलवानाशी असभ्य वर्तन करतात. ज्युनिअर विश्व चँपियनशिप असताना बृजभूषण सिंह हे या मुलींसोबत एकाच मजल्यावर राहिले होते. ते आपल्या रूमचा दरवाजा उघडा ठेवत असत आणि मुलींना संकोच वाटेल असं वर्तन करत असत. त्यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात यावं अशी मागणी आम्ही करतो आहोत असंही अंशूने म्हटलं आहे.

आणखी वाचा- Wrestlers Protest: “…तर फाशी घेईन” लैंगिक शोषणाच्या आरोपांवर बृजभूषण सिंह यांचे स्पष्टीकरण; बदनामीच्या मागे उद्योगपती असल्याचा दावा

विनेश फोगाटने काय म्हटलं आहे?

भारतीय महिला पहिलवानांमध्ये सर्वात चर्चेत असलेल्या विनेश फोगाटने म्हटलं आहे की मी जेव्हापासून या प्रकरणात आवाज उठवला आहे तेव्हापासून ज्या मुलींना त्रास झाला आहे त्या मुली समोर येत आहेत. आम्ही बृजभूषण यांच्याविरोधात पुरावे द्यायलाही तयार आहोत. बृजभूषण सिंह यांनी राजीनामा दिला पाहिजे. तसं झालं नाही तर भारतीय कुस्ती परिषदेच्या सदस्यांनी तुरूंगात जायची तयारी ठेवावी. आम्ही जे बोलत आहोत ते वास्तव आहे. आमच्यासोबत आता दोन महिला मल्ल आहेत ज्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं. जर आमचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही तर कुस्ती महासंघाचे सदस्य तुरूंगात कसे जातील याची व्यवस्था आम्ही करू असंही विनेश फोगाटने म्हटलं आहे.

आणखी वाचा- विश्लेषण: जंतरमंतर का बनले कुस्तीगिरांचा आखाडा? कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर आरोप नेमके काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंशू मलिकनेही बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप केले आहेत. मलाच नाही तर इतर अनेक मुलींनाही बृजभूषण सिंह यांनी त्रास दिला आहे. त्यांना संकोच वाटेल असं वर्तन त्यांनी अनेकदा केलं आहे असंही अंशू मलिकने म्हटलं आहे. आता कुस्तीच्या आखाड्यात सुरू झालेली ही आरोपांची दंगल कुठल्या दिशेने जाणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे.