जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात ब्राह्मण प्राध्यापकांच्या केबिनवर “परिसर सोडा आणि शाखेत परत जा” अशा घोषणा लिहिण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी (१ नोव्हेंबर) समोर आला. यानंतर विद्यापीठ प्रशासनाने एक निवेदन जारी करत या प्रकाराचा निषेध केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेएनयूमधील इंटरनॅशनल स्टडीज विभागाच्या इमारत क्रमांक दोनमध्ये विविध ब्राह्मण प्राध्यापकांच्या कार्यालयाच्या दरवाजावर स्प्रेने या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. नलिन कुमार मोहपात्रा, राज यादव, प्रवेश कुमार आणि वंदना मिश्रा या प्राध्यापकांच्या केबिनवर ‘शाखेत परत जा’ अशा घोषणा कलर स्प्रेने लिहिण्यात आल्या आहेत.

‘जेएनयू टीचर फोरम’ने या प्रकारानंतर ट्वीट करत डाव्या उदारमतवादी समुहावर प्रत्येक विरोधी आवाज दडपण्याचा आरोप केला आहे. तसेच विद्यापीठ परिसरात सर्वांना सारखीच वागणूक मिळावी, अशी मागणी केली आहे.

जेएनयूमधील ब्राह्मणविरोधी घोषणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ‘ब्राह्मण लाईव्ह मॅटर’ (Brahmins Lives Matter) हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. भाजपाशी संलग्न अखील भारतीय विद्यार्थी संघटनेने (एबीव्हीपी) या प्रकारासाठी डाव्या विद्यार्थी संघटनांवर आरोप केला आहे.

हेही वाचा : ‘जेएनयू’तील प्रा. बाविस्कर यांची अपहरणानंतर सुटका

या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने निवदेन जारी करत विद्यापीठ सर्वांसाठी असल्याचं म्हटलं. तसेच शिक्षकांच्या केबिनवर लिहिण्यात आलेल्या या घोषणांचा निषेध करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti brahmin slogans painted in jnu campus inquiry ordered pbs
First published on: 02-12-2022 at 12:14 IST