तैवानचे नवनिर्वाचित अध्यक्ष लाय चिंग-दे यांनी गेल्या आठवड्यात सत्ताग्रहण सोहळ्यात केलेल्या भाषणामुळे चिनी नेतृत्व बिथरले आहे. तैवानने लोकशाहीची भाषा केल्यामुळे आणि स्वातंत्र्य अधोरेखित केल्यामुळे ‘शिक्षा’ म्हणून तैवानच्या भोवताली चीनने दोन दिवस लष्करी, हवाई आणि नाविक युद्ध कवायती केल्या. यावरून चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांनी तैवानला इशारा दिला आहे. तैवानला चीनपासून जो वेगळा करण्याचा प्रयत्न करेल त्याचा आत्मनाश होईल, अशी धमकीच त्यांनी दिली आहे.

“चीनने नेहमीच इतर देशाच्या कायद्यांचा आदर केला आहे. चीनच्या सार्वभौमत्त्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करणे हे चिनी सैन्याचे पवित्र कार्य आहे. तैवान प्रश्न हा चीनच्या मूळ हितसंबंधाच्या केंद्रस्थानी आहे. परंतु, वन चीन (One China) तत्त्व हे आंतरराष्ट्रीय संबंधांना शासित करणारे एक नियम बनले आहे. तैवानमधील डीपीपी अधिकारी विभक्त होण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते तैवानची चिनी ओळख पुसून टाकण्याच्या आणि तैवान सामुद्रधुनी ओलांडून सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध तोडण्याकरता प्रयत्न करत आहेत. या फुटीरतावाद्यांनी अलीकडेच धर्मांध विधाने केली आहेत, जी चिनी राष्ट्र आणि त्यांच्या पूर्वजांचा विश्वासघात करत आहेत”, असंही डोंग जून म्हणाले.

हेही वाचा >> विश्लेषण : तैवानला जेरीस आणण्यासाठी चीनचे ‘ग्रे झोन ॲग्रेशन’… काय आहे ही व्यूहरचना?

आम्ही मजबूत शक्ती बनून राहू

“तैवानसंबंधातील समस्या चिनी कायद्यानुसार हाताळणे हे पूर्णपणे कायदेशीर आहे. यात कोणताही परकीय हस्तक्षेप नाही. चीन शांततापूर्ण पुनर्मिलनासाठी वचनबद्ध आहे. राष्ट्रीय विभाजनाचा धोका अजूनही आहे. चिनी पिपल्स लिबरेशन आर्मी राष्ट्रीय पुनर्मिलन टिकवून ठेवण्यासाठी एक मजबूत शक्ती बनून राहील. तैवानच्या स्वातंत्र्याला आळा घालण्यासाठी आम्ही ठोस कृती करू आणि असा डाव कधीही यशस्वी होणार नाही, याची खात्री करू. जो कोणी तैवानला चीनपासून वेगळे करण्याचे धाडस करेल त्याचा आत्मनाश होईल, असंही ते म्हणाले.

“बाहेरील शक्तींमुळे दोन देशांतील द्वीपक्षीय करार मोडला गेला आहे. आमच्या क्षेत्राच्या एकूण हितांकडे दुर्लक्ष केले आहे. बाहेरील देशाला मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्याची परवानगी देऊन ASEAN चार्टरचे उल्लंघन केले आहे”, असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमका वाद काय?

तैवान, जपान आणि फिलिपिन्स या तिन्ही देशांशी अमेरिकेने संरक्षण करार केलेले आहेत. पण त्यांना जरब बसावी इतकाच त्रास द्यावा, पण अमेरिकेला हस्तक्षेप करावा लागेल इतपत पीडू नये, असे चीनचे धोरण आहे. अनेक विश्लेषकांच्या मते  अशा प्रकारे चीनची अनेक उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. अप्रत्यक्ष युद्धाच्या निमित्ताने चीनचा युद्धसराव सुरू असतो. शिवाय उद्या खरोखरच युद्धाला तोंड फुटले, तर इतर कोणत्याही देशापेक्षा चीन अधिक तयारीत असेल. याशिवाय तैवान, जपान, फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया या देशांच्या सागरी हद्दीच्या आतबाहेर सतत संचार करत राहिल्यामुळे सागरमार्गे होणाऱ्या व्यापारावर नजर आणि नियंत्रणही ठेवता येते.