सियाचिनमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर सोमवारी सकाळी कोसळले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून, हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिक सुखरुप आहेत. 
लष्कराच्या ताब्यात असलेले ध्रुव हेलिकॉप्टर सोमवारी सकाळी आठच्या सुमारास सियाचिन ग्लेशियरमध्ये कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक होते. त्यापैकी एकाला सौम्य दुखापत झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही वैमानिकांना सुखरुपपणे लष्काराच्या तळावर परत आणण्यात आले आहे. नैमित्तिक सरावासाठी या हेलिकॉप्टरने लेहवरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात ते कोसळले, अशी माहिती सूत्रांनी दिली.