पीटीआय, चंडीगड

आम आदमी पक्ष हरियाणा विधानसभेच्या सर्व ९० जागा स्वबळावर लढवेल, तर लोकसभेची निवडणूक इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून लढवेल अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केली. लोकसभा निवडणूक एप्रिल-मे महिन्यांमध्ये होणार आहेत तर विधानसभेची निवडणूक या वर्षांच्या अखेरीस होईल. हरियाणात लोकसभेच्या १० जागा आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिंद येथे आपची बदलाव जनसभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये बोलताना केजरीवाल म्हणाले की, आज लोकांचा केवळ आपवर विश्वास आहे. एकीकडे पंजाब आहे तर दुसरीकडे दिल्ली. आज हरियाणातील लोकांना बदल हवा आहे. दिल्ली आणि पंजाबमधील लोकांनी बदल घडवला आणि आता ते आनंदात आहेत असा दावा त्यांनी केला.