अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांचे वजन घटले नाही, तर उलट १ किलोनी वाढले, असा दावा दिल्लीतील भाजपाचे विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी यांनी केला आहे. बुधवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. महत्त्वाचे म्हणजे भाजपा नेत्याच्या दाव्यानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे

‘द इकॉनॉमिक्स टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील भाजपाचे विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी यांनी केजरीवाल यांचे वाढले असल्याचे म्हटले आहे. तसेच केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाबही सामान्य असल्याचा दावा बिधुरी यांनी केला आहे. ”अटक झाल्यानंतर चार दिवसांत अरविंद केजरीवाल यांचे वजन ४.५ किलोने कमी झाल्याचे आदमी पक्षाने म्हटले आहे. मात्र, अधिकृत माहितीनुसार, त्यांचे वजन कमी झाले नसून उलट १ किलोनी वाढले आहे”, असे ते म्हणाले.

AAP MP Swati Maliwal and YouTuber Dhruv Rathee
ध्रुव राठी आणि ‘आप’वर स्वाती मालिवाल यांचा मोठा आरोप; म्हणाल्या, “बलात्कार आणि जीवे मारण्याची..”
ravindra dhangekar on pune accident
“पुणे अपघातप्रकरणात २-३ व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केलंय”, रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप; रोख नेमका कोणावर?
Why Israel compassion for Hamas war victims cost lives
युद्धग्रस्तांबाबतची सहृदयताच जीवावर बेतली, असे का व्हावे?
pune lok sabha, rupali chakankar pune marathi news
पराभवाच्या भीतीने आणि नैराश्यातून रवींद्र धंगेकरांचे आरोप सुरू – रुपाली चाकणकर
Swastik Maheshwari
चौथ्या टप्प्यातील मतदानाआधीच ममता बॅनर्जींना मोठा धक्का; टीएमसी उमेदवाराची पत्नी भाजपात दाखल
Chief Minister Eknath Shindes taunts to Naresh Mhaske attempt to comfort BJP leaders
मुख्यमंत्र्यांच्या नरेश म्हस्केंना कानपिचक्या, भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
abhishek banerjee challenges amit shah
“हिंमत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा”, ममता बॅनर्जींच्या पुतण्याचे अमित शाह यांना आव्हान; म्हणाले, “जी व्यक्ती…”
Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले

अरविंद केजरीवाल यांनी आठवड्यातून पाच वेळा त्यांच्या वकीलांना भेटण्याची परवानगी मागितली आहे. मात्र, त्यांना न्यायालयाने केवळ दोन वेळाच भेटण्याची परवानगी दिली आहे. सामान्य व्यक्ती असो किंवा व्हीआयपी, नियम सर्वांसाठी सारखे आहे. असेही ते म्हणाले.

हेही वाचा – जिवंत असून लाल बिहारींना करण्यात आलं होतं मृत घोषित, आता नरेंद्र मोदींविरोधात लढणार न…

केजरीवाल यांचे वजन घटल्याचा आपचा दावा

दोन दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांचे वजन ४.५ किलोनी घटल्याचा दावा केला होता. अरविंद केजरीवाल यांना मधुमेहाची गंभीर समस्या आहे. पंरतु, त्यांनी कधी त्यांच्या आरोग्याच्या समस्यांना देशसेवेमध्ये अडथळा बनू दिलं नाही. भाजपा सरकारने त्यांना अटक केल्यापासून त्यांची प्रकृती ढासळली आहे. ईडीच्या कोठडीत असल्यापासून आतापर्यंत त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी तीन वेळा घसरली आहे. अटकेपासून १२ दिवसांत त्यांचं वजन ४.५ किलोने घटलं आहे. मधुमेहग्रस्त व्यक्तीचं वजन अशा पद्धतीने इतक्या वेगाने घसरणं खूप गंभीर बाब मानली जाते. त्यांच्यासमोर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असे त्या म्हणाल्या होत्या.

तिहार जेलच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण

दरम्यान, आम आदमी पक्षाच्या दाव्यानंतर तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांचे वजन कमी झाले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना रोज घरचे जेवण दिले जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले होते.

मद्यधोरण घोटाळ्यात केजरीवाल यांना अटक

अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी २१ मार्च रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. तसेच दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांची कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर ईडीने केलेली कारवाई ही बेकायदेशीर असून कोठडीतून सुटका करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केली. मात्र, ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.