दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या कृष्णा मेनन मार्गावरील निवासस्थानी भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. खूप चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. दिल्लीशी संबंधित विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. दिल्लीच्या विकासाठी एकत्र काम करण्यावर आमचे एकमत झाले आहे” असे अरविंद केजरीवाल यांनी या भेटीनंतर केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

दिल्ली निवडणुकीच्याआधी ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी अमित शाह यांच्या भेटीची वेळ मागितली होती. शाह यांच्या कार्यालयाने त्यावेळी भेटीची वेळ नाकारली होती. अमित शाह यांच्याकडे भाजपाच्या दिल्लीच्या प्रचाराची धुरा होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal meets amit shah at home dmp
First published on: 19-02-2020 at 16:13 IST