Asaduddin Owaisi Praise For Mohammed Siraj Ind Vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने थरारक विजय मिळवला आहे. ओव्हलच्या मैदानावर मिळालेला हा विजय आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने घेतलेले पाच विकेट्स यावरवर हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अस्सल हैदराबादी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

त्यांनी मूळचा हैदराबादचा असलेल्या मोहम्मद सिराजचे अभिनंदन करताना एक्सवर खास पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, “नेहमीच एक विजेता, मोहम्मद सिराज! जसे आपण हैदराबादीमध्ये म्हणतो, पुरा खोल दिए पाशा!”

मोहम्मद सिराजने या कसोटी मालिकेत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये २३ बळी घेतले आहेत. त्याच्या या जबरदस्त कामगिरीनंतर त्याला अखेरच्या सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. ओवैसी हे सिराजचे चांगलेच चाहते राहिले आहेत, यापूर्वीही त्यांनी त्याचे अनेकदा कौतुक केले आहे.

३१ वर्षीय मोहम्मद सिराज याची पार्श्वभूमी सामन्य राहिली आहे, असे असताना देखील त्याने मेहनतीच्या जोरावर क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये स्वतःची वेगळी ऑळख निर्माण केली आहे. मालिकेतील अखेरच्या कसोटी समान्यात भारताने मिळवलेल्या विजयात सिराजचा मोठा वाटा पाहिला आहे. त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात ५ बळी नावावर केले. यापैकी तीन बळी हे त्यांने अखेरच्या दिवशी घेतले. याबरोबरच भारताने इंग्लडचा सहा धवांनी पराभव केला आहे. यामुळे भारताने अँडरसन – तेंडुंलकर ट्रॉफीमध्ये २-२ ने बरोबरी साधली.

या मालिकेसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय संघात तुलनेने तरूण खेळाडूंचा भरणा होता. तसेच भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा पहिल्यांदाच शुभमन गिल याच्याकडे सोपवण्यात आली होती. रोहित शर्मा, विराट कोहली असे दिग्गज क्रिकेटपटू निवृत्त झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लडमधील आव्हानात्मक परिस्थितीचा सामना कसा करतो याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. पण या मालिकेच शुभमन गिल हा कर्णधार आणि फलंदाज अशा दोन्ही आघाड्यांवर चांगलाच चमकल्याचे पाहयला मिळाले. त्याने या पाच सामन्यांमध्ये अनेक रेकॉर्ड मोडले. तसेच त्याच्या कर्णधार म्हणून खेळलेल्या पहिल्याच मालिकेत त्याला ‘मॅन ऑफ द सिरीज’चा मान देखील मिळाला.