आसाराम बापू आणि त्यांचा पुत्र नारायणसाई यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या बलात्कार प्रकरणातील तीन साक्षीदारांची हत्या करणारा आणि अन्य चार साक्षीदारांच्या हत्येचा प्रयत्न करणारा आरोपी पशिचम बंगालचा नागरिक असून त्याला गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि अहमदाबाद गुन्हा अन्वेषण विभागाने संयुक्त कारवाई करून अटक केली आहे.
सदर आरोपीचे नाव कार्तिक ऊर्फ राजू दुलालचंद हलदर, असे असून तो पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्य़ातील रहिवासी आहे. तो २००० मध्ये साधू झाला आणि आसाराम यांचा अनुयायीही बनला, असे पलिसांनी सांगितले. छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्य़ातील सरोना बाजारमधून कार्तिकला अटक करण्यात आली, तेथे तो दडून बसला होता, कार्तिक याने शस्त्रांचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते आणि त्यामुळेच चार साक्षीदार बचावले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कार्तिकने २००० मध्ये दिल्लीतील सत्संगाला हजेरी लावली होती. त्यानंतर २००१ मध्ये तो आसाराम यांच्या मोतेरा आश्रमात दाखल झाला. साक्षीदारांवर हल्ला करण्यासाठी आश्रमातील अन्य साधकांनी आर्थिक साहाय्य केल्याचे त्याने सांगितले. कार्तिकने देशी बनावटीची १० पिस्तुले आणि सात पिस्तुले आणि ९४ फैरी झारखंड आणि उत्तर प्रदेशातील शस्त्र दलालांकडून मिळविली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaram bapu partner arrested in murder of three witnesses
First published on: 15-03-2016 at 03:48 IST