पीटीआय, नवी दिल्ली

बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची प्रकृती खालावत असल्याने  शिक्षेला स्थगिती द्या, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. त्याचे वय आणि गुंतागुंतीचे आजार लक्षात घेऊन शिक्षा स्थगित करा अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती.

supreme court verdict evm vvpat
EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या; न्यायमूर्ती म्हणाले…
Supreme Court verdict on minor abortion
तिसाव्या आठवडयात गर्भपातास परवानगी; अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
supreme court
नुकसानभरपाईच्या पुनरावलोकनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; हवाई दल अधिकाऱ्याला एचआयव्ही संसर्ग
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

 आसारामने महाराष्ट्रातील खोपोलीतील माधवबाग हृदय रुग्णालयात उपचार घेण्याचा आपला सल्ला स्वीकारला असल्याचे वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्या. संजीव खन्ना, न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने रोहतगी यांना या प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा >>>Video: JNU मध्ये पुन्हा राडा; अभाविप व डाव्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, निवडणुकीचं वातावरण तापलं!

न्या. खन्ना यांनी या खटल्यातील दोषारोप आणि शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयासमोरील अपीलाच्या सुनावणीला जाणीवपूर्वक विलंब करण्याच्या आसारामच्या प्रयत्नाकडेही लक्ष वेधले.

रोहतगी यांनी आसारामला अनेकदा हृदयविकाराचा झटका आल्याचे आणि वयाशी संबंधित इतर आजारांसोबतच तो गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्रावासह अ‍ॅनिमियाने ग्रस्त असल्याचे सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अपीलची जलद सुनावणी करण्याचे निर्देश दिले.

वकील राजेश गुलाब इनामदार यांनी आसारामच्या वतीने याचिका दाखल केली आहे. आसारामने या खटल्यात ११ वर्षे ७ महिन्यांहून अधिक काळ शिक्षा भोगल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. आसारामला हृदयविकार, अति थायरॉईड, आतडे व जठरात रक्तस्रावासह अशक्तपणा, सौम्य प्रोस्टेटिक हायपरप्लासिया आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, कोविड-न्यूमोनिया आणि यूरोसेप्सिस यासह अनेक आजारांनी ग्रस्त आहे. त्याच्या हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा कमी होत आहे. त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्याचा तुरुंगातच वेदनादायी मृत्यू होण्याची भीती आहे, असे याचिकेत म्हटले होते.