बँकॉक : आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (ॲपेक) या आशियायी आणि प्रशांत महासागरी प्रदेशातील देशांच्या आर्थिक सहकार्य राष्ट्रगटाने रशियाने युक्रेन युद्ध थांबवावे असे आवाहन केले. शनिवारी परिषदेच्या समारोपात या प्रदेशातील देशांच्या अर्थव्यवस्थांच्या शाश्वत विकासाचा संकल्प केला.

यजमान थायलंडने या राष्ट्रगटाच्या २१ सदस्यांतील युक्रेन आणि रशिया संघर्षांसंदर्भात मतभेद दूर करण्यासाठी केलेल्या आक्रमक राजकीय मुत्सद्देगिरीमुळे या गटाच्या बहुतेक सदस्यांनी युद्धाचा निषेध केला आहे. रशिया हा चीनप्रमाणेच या गटाचा सदस्य आहे. या युद्धासंदर्भात चीनने रशियावर टीका करणे टाळले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ॲपेक’च्या सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांनी या जाहीरनाम्यात या युद्धावरील मतभेदांची कबुली दिली. त्यात नमूद केले, की हा राष्ट्रगट व्यापार व घनिष्ठ आर्थिक संबंधांना प्रोत्साहनासाठी समर्पित आहे. अशा आंतरराष्ट्रीय संघर्षांचे निराकरण करण्याचे हे व्यासपीठ नाही. मात्र युद्ध व इतर संघर्षांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात.