ऑस्ट्रेलियात प्राणघातक हल्ला झालेला भारतीय वंशाचा विद्यार्थी कोमातून बाहेर आला असून, त्याची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मनराजविंदर सिंग या २० वर्षीय विद्यार्थ्यावर आठ जणांच्या अज्ञात टोळक्याने हल्ला केला होता. तेव्हापासून मनराजविंदर कोमामध्ये होता. अखेर आज (सोमवार) तो कोमातून बाहेर आला असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. अटक झालेल्या हल्लेखोरांपैकी एका अल्पवयीन मुलाला ऑस्ट्रेलियन न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. चौकशीदरम्यान, या टोळीने 'केवायआर'(किल युवर रायवल्स) नावाची एक टोळी बनविली असून, ही टोळी एकट्या भारतीयांना गाठून त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करत असल्याचे समोर आले आहे.