scorecardresearch

National Flag: वाघा बॉर्डरवर लाहोरमधूनही दिसेल इतक्या उंचीचा राष्ट्रध्वज उभारणार

अमृतसर आणि लाहोर ही दोन्ही शहरे सीमेपासून १८ किलोमीटर अंतरावर आहेत.

Attari Wagah border , national flag , tricolour , Lahore , India pakistan, Pathankot attack, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Attari Wagah border : अटारी-वाघा सीमेवर होणारे लष्करी संचलन अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. यावेळी दोन्ही देशांच्या प्रेक्षकांचा उत्साह पाहण्याजोगा असतो.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अटारी-वाघा सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाकडून (बीएसएफ) भारतीय राष्ट्रध्वजाची स्थापना करण्यात येणार आहे. या राष्ट्रध्वजाचे वैशिष्ट्य म्हणजे हा ध्वज तब्बल ३५० फुट इतक्या उंचीवर फडकणार आहे. त्यामुळे भारताचा तिरंगा थेट लाहोर आणि अमृतसरमधूनही पाहता येईल. अमृतसर आणि लाहोर ही दोन्ही शहरे सीमेपासून १८ किलोमीटर अंतरावर आहेत. पुढीलवर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची बीएसएफची योजना आहे. वाघा सीमेवर होणाऱ्या ऐतिहासिक संचलनाच्याठिकाणी असणाऱ्या प्रेक्षक गॅलरीच्या विस्ताराचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात येणार आहे. दरम्यान, ३५० फुटांच्या उंचीवर उभारण्यात येत असल्यामुळे या राष्ट्रध्वजाचा आकारही खूप मोठा असेल. अटारी-वाघा सीमेवर होणारे लष्करी संचलन अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. यावेळी दोन्ही देशांच्या प्रेक्षकांचा उत्साह पाहण्याजोगा असतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-04-2016 at 10:15 IST

संबंधित बातम्या