राजधानी किव्ह आणि रशियन फौजांनी वेढलेल्या आसपासच्या शहरांतून सुमारे १८ हजार लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

हे प्रयत्न निरनिराळय़ा मानवी कॉरिडॉरमार्फत स्थलांतराच्या व्यापक प्रयत्नांचा भाग असल्याचे सांगतानाच, रशियन फौजांनी युद्धविरामाच्या आश्वासनांचा भंग करू नये, असा इशारा त्यांनी दिला.

Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
in Nagpur, Attempted Gang Rape, Raises Concerns, Women Safety, Attempted Gang Rapein Nagpur, crime in nagpur, nagpur crime, police, nagpur news, marathi news,
गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

‘आमच्यासाठी विमाने पाठवा,’ असे सांगून झेलेन्स्की यांनी परराष्ट्रांना हवाई मदतीचे पुन्हा आवाहन केले. पाश्चिमात्य सत्तांनी लष्करी सामग्री पाठवून युक्रेनच्या पूर्वेला सैन्यसज्जता वाढवली आहे, मात्र हवाई मदत पुरवण्याबाबत आणि रशियाशी थेट युद्धात उतरण्याबाबत त्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

झेलेन्स्की यांनी रशियाच्या सैनिकांना युक्रेनमधून निघून जाण्याचे रशियन भाषेत आवाहन केले. ‘गेले दोन आठवडे आम्ही केलेल्या प्रतिकारातून, आम्ही शरण येणार नाही हे तुम्हाला दिसून आले आहे, कारण हे आमचे घर आहे. ही आमची कुटुंबे आणि मुले आहेत. आम्ही आमची भूमी परत मिळवेपर्यंत लढत राहू. तुम्ही घरी परत गेलात तर अजूनही स्वत:ला वाचवू शकाल,’ असे ते  म्हणाले.