Akhilesh Yadav : उत्तर प्रदेशातल्या अयोध्येतल्या भदरसा या ठिकाणी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. या प्रकरणात आता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर मोठी मागणी केली आहे. पीडित मुलीला उत्तम वैद्यकीय उपचार पुरवा आणि तिच्या सुरक्षेचीही मागणी करत न्यायालयाला विनंती केली.

अखिलेश यादव यांची पोस्ट काय?

अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) यांनी एक्स या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत म्हटलं आहे की बलात्कार पीडितेला सरकारने चांगल्यात चांगले उपचार द्यावेत तसंच तिच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. माननीय न्यायालयाला माझी विनंती आहे की परिस्थितीची संवेदनशीलता आणि गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने पीडित मुलीची सुरक्षा सुनिश्चित करावी. अशा घटनांचं राजकारण करणाऱ्या लोकांचा हेतू पूर्ण होता कामा नये.

तसंच अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) यांनी ही मागणीही केली आहे भदरसा बलात्कार प्रकरणात ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांची डीएनए चाचणी करुन पीडितेला न्याय द्यायला हवा. फक्त आरोप करुन राजकारण होता कामा नये. १२ वर्षीय पीडितेच्या बलात्कार प्रकरणाचं राजकारण कुणीही करु नये. तसंच पीडित कुटुंबाला २० लाख रुपयांची मदत केली गेली पाहिजे. अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) यांनी डीएनए चाचणीची मागणी केल्यानंतर वाद निर्माण झाला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) यांच्यावर टीका केली.

lok sabha
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव 18 व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेताना भारतीय राज्यघटनेची प्रत दाखवत शपथ घेतली होती. (पीटीआय फोटो)

केशव मौर्य काय म्हणाले?

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) यांना वाटतं आहे की आपण अशा मागण्या केल्या नाहीत तर आपली व्होट बँक नाराज होईल. डीएनए चाचणी मागणी करुन न्यायालयाची दिशाभूल करु नये. जे या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं केशव मौर्य यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Rahul Gandhi : “मला शिवीगाळ केली”, राहुल गांधी-अनुराग ठाकुरांमध्ये खडाजंगी; अखिलेश म्हणाले, “सभागृहात जात विचारून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अयोध्येची घटना नेमकी आहे काय?

अयोध्येतल्या कलंदर पोलीस ठाणा भागात १२ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. तसंच त्या मुलीचा अश्लील व्हिडीओ तयार करुन तिला वारंवार ब्लॅकमेल केलं गेलं. दीर्घकाळ हा गुन्हा घडला, ज्यानंतर १२ वर्षांची पीडिता गरोदर राहिली. अडीच महिन्यापूर्वी ही पीडिता शेतात काम करुन परतत होती. त्यावेळी राजू नावाचा एक माणूस तिला भेटला त्याने तिला सांगितलं की बेकरी मालक मोईद खान यांनी तुला बोलवलं आहे. ही पीडिता मोईद यांनी बोलवलं आहे म्हणून गेली तेव्हा मोईदने तिच्यावर बलात्कार केला. तसंच राजूने त्याचा व्हिडीओ चित्रित केला. त्यानंतर राजूनेही या मुलीवर बलात्कार केला. या दोघांनी दीर्घकाळ त्या मुलीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर बलात्कार केला. ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस आलं.