बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नितीश कुमार यांची गेल्या काही दिवसांतील भाजपशी वाढती जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. याबद्दल नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांनी कोणतेही भाष्य करणे टाळले होते. मात्र, एकूणच भाजप आणि नितीश कुमार यांच्या बदललेल्या परस्परपूरक भूमिकांमुळे त्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सुरूवातीला नोटाबंदीवरून आक्रमक असलेल्या नितीश कुमारांचा टीकेचा सूर अचानक मवाळ झाला होता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच काही दिवसांपूर्वी नितीश यांनी पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतली होती. त्यामध्ये आता भाजप सरकारशी उत्तम सूत जुळलेल्या रामदेव बाबा यांनी नितीश कुमार यांची प्रशंसा केली आहे. नितीश यांनी बिहारमध्ये लागू केलेला दारूबंदीचा निर्णय उत्तम असल्याचे त्यांनी म्हटले. रामदेव बाबा सध्या योग कार्यक्रमाच्यानिमित्ताने बिहारमध्ये आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीश यांची मुक्तकंठाने कौतूक केले. बिहार सरकारने लागू केलेला दारूबंदीचा निर्णय एक चांगले पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, रामदेव बाबा यांचे हे वक्तव्य नितीश यांची एनडीएच्या वर्तुळाशी पुन्हा वाढत असलेली जवळीक स्पष्ट करणारे असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मोदी-नितीशकुमार भेटीने राजकीय चर्चेला ऊत!

यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्यावेळी नितीश कुमार यांनी एनडीएशी फारकत घेतल्यानंतर रामदेव बाबा यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. राष्ट्रहितासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी नितीश यांना केले होते. मोदी केंद्रात नेतृत्त्व करण्यासाठी सक्षम आहेत. जेव्हा राष्ट्रीय राजकारणाची बाब येईल तेव्हा जनता मोदींना साथ देईल. त्यामुळे नितीश यांनी मोदींना पाठिंबा द्यावा, असे त्यांनी म्हटले होते.

रामदेव बाबा यांचा ‘कृष्णकुंज’वर ‘राज’योग!