पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बंगळुरुमधील विशेष न्यायालयाने हा निर्णय़ दिला असून, १० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सेंट्रल क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, फैज राशीद हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यानंतर त्याने फेसबुक पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
mumbai 8 year old girl rape marathi news
मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला होता. तपासाचा भाग म्हणून फॉरेन्सिकडून मोबाईलची तपासणी करण्यात आली होती. पोलिसांनी विविध कलमांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी त्याला अटक करण्यात आली. फेब्रुवारी २०१९ पासून राशीद कारागृहात आहे. त्याची जामीन याचिका फेटाळण्यात आली होती. या प्रकरणात अनेक पोलीस कर्मचारीच साक्षीदार होते.