चंडीगड : पंजाबचे राज्यपाल आणि चंडीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा सादर केला. वैयक्तिक कारणांसाठी व इतर काही जबाबदाऱ्यांसाठी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा >>> संघ स्वयंसेवक ते उपपंतप्रधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरोहित यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला. चंडीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने  घवघवीत यश मिळवताना सर्व तिन्ही पदे जिंकली होती. यामुळे जोरदार धक्का बसलेल्या काँग्रेस- आप आघाडीने निवडणूक अधिकाऱ्यावर मतपत्रिकांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. यानंतर काही दिवसांनी पुरोहित- शहा यांची भेट झाली. पंजाबचे राज्यपाल व चंडीगडचे प्रशासक म्हणून नेमणूक होण्यापूर्वी पुरोहित यांनी २०१६ ते २०१७ या कालावधीत आसामचे, तर २०१७-२०२१ या कालावधीत तमिळनाडूचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.