भारतातील पंजाबमधे असलेल्या वाघा बॉर्डवर स्वातंत्र्य दिनाचा शानदार सोहळा रंगला. दरवर्षीय प्रमाणे याही वर्षी ‘बिटिंग द रिट्रिट’ महोत्सव पाहण्यासाठी देशातील अनेक लोक गर्दी केली होती. या वर्षीही भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्साह देशभरात कायम आहे. भारतीय सैन्यदलाचे जवान आणि पाकिस्तानी रेंजर्स हे मिळून डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या कवायती सादर करतात.  हा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. देशभक्तीनं प्रेरित झालेले जवान आपल्या कवायती सादर करत होते, त्यावेळी उपस्थितांनी भारतमाता की जयच्या घोषणा दिल्या. तसंच भारतीय सैन्यदलाचे जवान करत असलेल्या कवायतींना टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर्यास्ताच्या वेळी बिगुल वाजवून राष्ट्रध्वज उतरवला जातो आणि अत्यंत सन्मानानं तो ठेवला जातो. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आपले ध्वज खाली उतरवात आणि सन्मानानं ठेवले जातात. आता सूर्योदय झाल्यानंतर हे दोन्ही ध्वज पुन्हा फडकवले जातील. आजही ही प्रथा रोजच्या प्रमाणेच पाळली गेली.  १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी हा सोहळा विशेष पाहण्यासारखा असतो. भारतीय सैन्यदलाचं रौद्ररूप काय असतं ते यावेळी पाहता येतं. आजही हजारो लोकांनी हा अनुभव घेतला.

<blockquote class=”twitter-tweet” data-lang=”en”><p lang=”en” dir=”ltr”>Beating retreat ceremony underway at Attari Wagah Border <a href=”https://twitter.com/hashtag/IndependenceDayIndia?src=hash”>#IndependenceDayIndia</a&gt; <a href=”https://t.co/dxQzyP4i9v”>pic.twitter.com/dxQzyP4i9v</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href=”https://twitter.com/ANI/status/897448272226168832″>August 15, 2017</a></blockquote>
<script async src=”//platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

भारतातर्फे एकप्रकारे हे शक्तीप्रदर्शनच करण्यात येतं, हा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते आहे. वाघा बॉर्डरवर दोन्ही देशांचे ध्वज उतरविण्याची पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला देशातील लोकांचा उदंड प्रतिसाद मिळतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beating retreat ceremony being performed at attari wagah border amid chants of india zindabad by huge crowd
First published on: 15-08-2017 at 19:18 IST