Beef Biryani in AMU : अलिगड मुस्लिम विद्यापीठात नवा वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. येथे रविवारच्या दुपारच्या जेवणात चिकन बिर्याणीऐवजी बीफ बिर्याणी दिली जाईल, अशी नोटीस शेअर केल्यानंतर हा वाद निर्माण झाला. विद्यार्थ्यांना ही नोटीस सर शाह सुलेमान हॉलमध्ये आढळून आली होती, त्यानंतर ही नोटीस सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली, ज्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली.

दोन अधिकृत लोकांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “रविवारचा लंच मेन्यू बदलण्यात आला आहे आणि मागणीनुसार चिकन बिर्याणीऐवजी बीफ बिर्याणी दिली जाईल.”

एएमयू प्रशासनाने काय दिलं स्पष्टीकरण?

या वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तर देताना, एएमयू प्रशासनाने स्पष्ट केले की नोटीशीमध्ये टाईप करताना छूक झाली आहे आणि नोटीस जारी करण्यास जबाबदार असलेल्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

हे प्रकरण आमच्या लक्षात आणून देण्यात आले. आमच्या लक्षात आले की ही नोटीस जेवणाच्या मेन्यूबबद्दल होती. पण यामध्ये एक टायपिंग एरर होता. ही नोटीस ताबडतोब मागे घेण्यात आली कारण त्यावर अधिकृत स्वाक्षरी नव्हती, ज्यामुळे तिच्या सत्यतेबद्दल शंका निर्माण झाली होती,” असे प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दोन वरिष्ठ विद्यार्थ्यांना प्रोव्होस्ट (विद्यापीठाचे प्रमुख) यांनी कारणे दाखवा नोटीस (ती नोटीस जारी केल्याबद्दल) बजावली आहे. विद्यापीठाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी आम्ही हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेत आहोत, असेही निवेदनात सांगण्यात आले आहे.

भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

भारतीय जनता पक्षाचे नेते निशित शर्मा जे अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत यानी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विद्यापीठाच्या या प्रकरणाच्या हाताळणीबाबत टीका केली आणि विद्यापीठ कट्टरपंथी घटकांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रशासनाचा यामधील सहभाग लज्जास्पद आहे. सर शाह सुलेमान हॉलमध्ये चिकन बिर्याणीएवजी बीफ बीर्याणी दिली जाईल अशी नोटीस फिरवण्यात आली. ही नोटीस सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली, आणि ही जबाबदारी वरिष्ठ फूड कमिटी सदस्यांची होती. यामधून दिसून येते की प्रशासन अशा कट्टरपंथी घटकांना प्रोत्साहन देत आहे आणि विद्यार्थ्यांच्या चुकांवर पांघरूण घातले जात आहे,” असा आरोप शर्मा यांनी केला.