Keral Wayanad Rain : केरळच्या वायनाड या ठिकाणी निसर्गाचा रुद्रावतार कशाला म्हणतात ते पाहण्यास मिळालं आहे. प्रचंड पावसाने चारपेक्षा जास्त गावं होत्याची नव्हती झाली आहेत. भूस्खलन झालं आहे. ३०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर ३०० हून जास्त लोक बेपत्ता आहेत. केरळमध्ये निसर्ग तांडव करत असताना अनेक हृदयद्रावक आणि थरारक घटना समोर येत आहेत. बचाव पथकातल्या जवानांनी प्राण पणाला लावून घनदाट जंगलातला एका गुहेत आसरा घेतलेल्या मुलांची सुटका ( Wayanad rescue ) केली आहे. चार दिवसांपासून ही मुलं अन्न, पाण्यावाचून या गुहेत होती. त्यांनी या गुहेचा आधार घेतला होता. या सगळ्यांना अथक मेहनत करुन बचाव पथकाच्या जवानांनी सोडवलं ( Wayanad rescue ) आहे. या जवानांचे मुलांसह आलेले फोटो व्हायरल झाले आहेत. यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे यात शंकाच नाही.

नेमकं काय घडलं?

कालेपट्टा भागातल्या जंगलात एक महिला मुलांना अन्न आणि पाणी मिळावं म्हणून भटकत असल्याचं वनाधिकाऱ्यांनी पाहिलं. तिची विचारपूस केल्यानंतर महिलेने जवानांना सांगितलं की गुहेत तिची चार मुलं आहेत. त्यापैकी एक तिच्या बरोबर होता. तर तीन मुलं गुहेत होती. ही मुलं १ ते ४ वर्षे या वयाची आहेत. यानंतर बचाव पथकाने ८ तासांच्या अथक परिश्रमांची शर्थ केली. या आदिवासी मुलांना त्यांनी गुहेतून सोडवलं आणि त्यांना आईसह सुरक्षित स्थळी नेलं. ही मुलं चार दिवस अन्नपाण्यावाचून होती. त्यामुळे ती जगण्याची शक्यता संपलेली असताना बचाव पथकाने ही कमाल ( Wayanad rescue ) करुन दाखवली.

vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
navi mumbai,koparkhairane,footpath repairing started,
कोपरखैरणेत पदपथांची दुरुस्ती अखेर सुरू, सेक्टर १९ येथील मोठ्या खड्ड्यांमुळे पदपथ दोरी बांधून वापरासाठी बंद
A cage has been set up to imprison leopards at Dhagae Vasti Pune print news
ढगे वस्ती येथे बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे; विबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
Family members appeal not to believe rumors about Badlapur harassment case
त्या चिमुकल्यांची तब्येत व्यवस्थित; अफवांवर विश्वास ठेवू नका, सहकाऱ्यांचे आवाहन
Badalapur Crime News
Badlapur Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, लोकांचा प्रचंड उद्रेक, आत्तापर्यंत काय काय घडलं?
mystery of suicide of the two seekers grew search operation was carried out and bodies were recovered from valley
दोघा साधकांच्या आत्महत्येचे गूढ वाढले; शोध मोहीम राबवून दरीतून मृतदेह काढले
What happens to the body when you eat tulsi leaves
रोज सकाळी रिकाम्यापोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

हे पण वाचा- Who is Major Sita Shelke: ‘फक्त महिला म्हणून पाहू नका’, वायनाडमध्ये नदीवर पूल उभारणाऱ्या सीता शेळके कोण आहेत?

पानिया समुदायाचं कुटुंब गुहेत अडकलं

वायनाडच्या पानिया समुदायातील हे कुटुंब गुहेत अडकलं होतं. गुहेच्या वरच्या भागाला दरी होती. या ठिकाणी पोहचण्यासाठी बचाव पथकाला साडेचार तासांहून अधिक वेळ लागला. बचाव पथकातले जवान हशीस यांनी सांगितलं की आम्ही गुरुवारी या मुलांच्या आईला भटकताना पाहिलं त्या महिलेने सांगितलं की तिची तीन मुलं अडकली आहेत. त्यानंतर आम्ही प्रयत्न करुन या मुलांना वाचवलं ( Wayanad rescue ) असं हशीस यांनी सांगितलं.

Wayanad rescue efforts 4 forest officers
वायनाडच्या जंगलात तीन मुलं एका गुहेत अडकली होती. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

बचाव पथकाचे जवान हशीस यांनी काय सांगितलं?

पुढे हशीस यांनी असं सांगितलं की आम्ही जेव्हा अथक प्रयत्न करुन त्या गुहेजवळ पोहचलो त्यावेळी आम्ही पाहिलं की ही तीन मुलं खूप थकलेली होती. आम्ही आमच्याबरोबर जे अन्नपदार्थ घेतले होते ते त्यांना दिले. आम्ही त्यांची सुटका करण्यासाठी ( Wayanad rescue ) आलो आहोत हे त्यांना समजावून सांगितलं. या मुलांच्या अंगावर कापडी पट्टा बांधला त्यांना बरोबर घेऊन आम्ही निघालो. हशीस म्हणाले गु्हेत अडकलेली ही मुलं आणि त्यांचे वडील हा समाज एका विशेष वर्गाशी संबंध ठेवणारा आदिवासी समाज आहे. सहसा हे लोक इतर लोकांशी संवाद साधणं टाळतात. अशात या मुलांच्या आईने आम्हाला काय घडलं आहे ते सांगितलं त्यामुळे आम्ही या मुलांची सुटका करु शकलो. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.