scorecardresearch

प्रेयसीने दिली ‘अशी’ धमकी, नव्या नवरीला कारमध्येच सोडून पळून गेला नवरदेव, नवरीनेही केला पाठलाग…

नवरदेव त्याच्या नव्या नवरीसह लग्नमंडपातून घरी जात असताना त्यांची कार ट्रॅफिकमध्ये अडकली. तेव्हा हा नवरदेव नवरीला कारमध्येच सोडून पळून गेला.

Groom Ditch Newly married Bride
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील वाहतूक कोंडीची नेहमीच चर्चा होते.

ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्याच व्यक्तीसोबत लग्न करायला हवं, नाहीतर ती व्यक्ती तुमचं जगणं अवघड करू शकते असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय बंगळुरूवासियांना नुकताच आला आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील वाहतूक कोंडीची नेहमीच चर्चा होते. शहरातल्या ट्रॅफिकमध्ये अनेकदा गाड्या बराच वेळ अडकून पडल्याच्या घटना याआधी समोर आल्या आहेत. परंतु एक नवरदेव या वाहतूक कोंडीचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.

एक नवरदेव त्याच्या नव्या नवरीसह लग्नमंडपातून घरी जात होता. परंतु ही कार ट्रॅफिकमध्ये अडकली. तेव्हा हा नवरदेव कार आणि नवरीला तिथेच सोडून पळून गेला. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, हा नवरदेव ज्या तरुणीवर प्रेम करत होता तिला सोडून दुसऱ्याच मुलीसोबत त्याने लग्न केलं होतं. त्यानंतर त्याच्या प्रेयसीने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच तिने त्या दोघांचे खासगी फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली. या धमकीनंतर तरुण बिधरला आणि त्याच्या नव्या नवरीला सोडून पळून गेला.

परंतु पीडित नवरीने या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली. त्यामुळे हे प्रकरण समोर आलं. या तक्रारीनुसार नवरदेवाचं नाव जॉर्ज असं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून तो बेपत्ता आहे. ज़ॉर्ज हा नोकरीनिमित्त गोव्यात असताना त्याचं एका मुलीसोबत अफेयर होतं. त्याच मुलीच्या धमकीनंतर जॉर्ज पळून गेला.

एक्स गर्लफ्रेंडच्या धमकीनंतर नवरदेव गेला पळून

या घटनेच्या २० दिवसांनंतर नवरीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. तिने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, जॉर्जच्या गर्लफ्रेंडने त्याला त्यांचे खासगी फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर घाबरलेल्या जॉर्जने बंगळुरूतल्या महादेवपुरा येथील ट्रॅफिकमध्ये त्यांची कार अडकलेली असताना तिथून पळ काढला.

हे ही वाचा >> मुंबईच्या ९९ वर्ष जुन्या Gateway of India च्या भिंतीला तडे, पुरातत्व विभागाच्या अहवालामुळे चिंता!

पत्नीने केला पाठलाग

जॉर्जच्या पत्नीच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जॉर्जच्या पत्नीने म्हटलं आहे की, “जॉर्जची एक्स गर्लफ्रेंड त्याला धमकावत होती. त्यावर मी जॉर्जला घाबरून जाऊ नकोस असा सल्ला दिला. तसेच संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत असल्याचा विश्वास दिला. परंतु लग्नानंतर चर्चपासून घरी जाताना आमची कार ट्रॅफिकमध्ये अडकली होती. त्याचवेळी जॉर्ज तिथून पळून गेला.” त्यावेळी जॉर्जची पत्नीदेखील कारमधून उतरली आणि ती देखील जॉर्जच्या मागे धावली परंतु ती तिला अडवू शकली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 14:11 IST
ताज्या बातम्या