Bengaluru Woman Complaint against Husband: लग्न झाल्यानंतर पतीसह सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या एका महिलेला पतीच्या विकृत चाळ्यामुळे मोठा धक्का बसला आहे बंगळुरूमध्ये सदर धक्कादायक घटना घडली असून पत्नी आता पती आणि सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पतीनं त्यांच्या बेडरूममध्ये खासगी कॅमेरे बसवले होते. त्यातून खासगी क्षणांचे चित्रीकरण करून पत्नीला ब्लॅकमेल केले.

पत्नीनं पुढं आणखी एक धक्कादायक दावा केला. तिने तक्रारीत म्हटले की, पतीनं त्याच्या विदेशातील क्लाइंटबरोबर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणयासाठी माझ्यावर दबाव टाकला.

बंगळुरूच्या पुट्टेनहळ्ळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनंतर पीडित महिलेचा पती सय्यद इनामुल हक आणि इतर तीन व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पत्नीनं आरोप केला की, पतीने रेकॉर्ड केलेले व्हिडीओ त्याच्या मित्रांनाही दाखवले आहेत. तसेच ते व्हिडीओ ऑनलाइन शेअर करण्याची धमकी दिली.

पीडित पत्नीनं सांगितलं की, माझ्या संमतीशिवाय पतीनं खासगी कॅमेऱ्यातून व्हिडीओ आणि फोटो काढले. तसेच विदेशात असलेल्या त्यांच्या मित्रांना दाखवले. तसेच या व्हिडीओंचा आधार घेऊन त्याने माझ्यावर बळजबरी केली. जर मी त्याचे म्हणणे ऐकले नाही तर माझे व्हिडीओ ऑनलाइन शेअर करण्याची धमकी पतीनं दिल्याचे पत्नीनं सांगितलं.

पती आधीच विवाहित

पीडित पत्नीनं पुढं सांगितलं की, तिचा पती आधीच विवाहित होता. पण त्यानं ही बाब तिच्यापासून लपवून ठेवली होती. त्यामुळ तिची फसवणूक करण्यात आली. पतीला जाब विचारल्यानंतर त्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचाही आरोप पत्नीनं केला.

पुट्टेनहळ्ळी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.