बेनीप्रसादांच्या मते मोदी गुंड, तर आझम खान म्हणतात ‘कुत्ते के बच्चे का बडा भाई’!

निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तशी राजकीय टीकांमध्येही तितकीच तीव्रता येऊ लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी झोंबरी टीका केली आहे.

निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तशी राजकीय टीकांमध्येही तितकीच तीव्रता येऊ लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी झोंबरी टीका केली आहे.
नरेंद्र मोदी हे संघाचे गुंड असल्याचे काँग्रेसचे नेते बेनी प्रसाद वर्मा यांनी म्हटले आहे, तर दुसऱया बाजूला समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी मोदींना कुत्ते के बच्चे का बडा भाई असे संबोधले आहे.
बेनीप्रसाद म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या हत्येला संघ व भाजपच जबाबदार आहे. मोदी हे संघाचे गुंड असून राजनाथ सिंह हे त्यांचे गुलाम आहेत. भाजप व संघ मोदींना विकले गेले आहेत. मोदींचा एवढा प्रचार सुरू आहे की ते कधीच जमिनीवर नसतात. मोदी अतिआत्मविश्वासात वावरत असल्याचेही बेनीप्रसाद म्हणाले.
दुसऱया बाजूला आझम खान यांनी, “मानवतेची हत्या करणारा कधीच देशाचा पंतप्रधान होऊ शकणार नाही. मोदी हे ‘कुत्ते के बच्चे का बडा भाई’ आहेत.” अशी जहरी टीका केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Beni says modi a gunda of rss azam khan calls him brother of puppy