खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलल्यानंतर ‘भारतरत्न’बद्दल हजारो पोस्ट; मोदींकडे केली जातेय ‘ही’ मागणी

मोदींनी नाव बदलण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर भारतरत्न टॉप ट्रेण्डमध्ये आहे. हजारो लोकांनी यासंदर्भात ट्विट करत आता मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केलीय.

bharat ratna
मोदींनी ट्विटरवरुन दिली माहिती

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत मोदींनी ही माहिती दिली आहे. मोदींनी यासंदर्भातील दोन ट्विट केले असून हे नाव बदलण्यामागील कारणाचाही खुलासा त्यांनी केलीय. मात्र या घोषणेनंतर ट्विटरवर भारतरत्न ट्रेण्डींग टॉपिक आहे. मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देशातील सर्वोच्च खेळ पुरस्कार देण्याबरोबरच आता मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणीही केली जात आहे.

नक्की वाचा >> …म्हणून बदललं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव; मोदींनी सांगितलं कारण

मोदींनी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्याची घोषणा केल्यानंतर Bharat Ratna हा ट्विटरवर टॉप ट्रेण्डींग टॉपिक होता. हजारो लोकांनी हा शब्द वापरुन ट्विट करण्यास सुरुवात केली. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते व्हेरिफाइड अकाऊंट असल्याने मान्यवरांचाही समावेश होता. अगदी दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रींपासून ते मेजर सुंरेंद्र पुनियांपर्यंत अनेकांनी ट्विट करुन नाव बदलण्याचा निर्णय उत्तम आहे पण आता मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारही जाहीर करावा अशी मागणी केलीय.

मागील अनेक वर्षांपासून मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे. पाहूयात काही व्हायरल झालेली मान्यवरांची ट्विटस.

१)

२)

३)

४)

५)

६)

मोदी नाव बदलण्यासंदर्भात काय म्हणाले?

खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असं मोदींनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे. “मला देशभरातील नागरिकांनी अनेकदा खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्यात यावा अशी मागणी केली. मी त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल त्याचे आभार मानतो. त्यांच्या भावनांचा आदर करुन यापुढे खेलरत्न पुर्सकारांचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावाने ओळखला जाईल,” असं मोदी पहिल्या ट्विटमध्ये म्हणालेत.

दुसऱ्या ट्विटमध्ये मोदींनी, “मेजर ध्यानचंद हे भारतातील आघाडीचे खेळाडू होते. त्यांनी देशाला भरपूर मान मिळवून दिला. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद यांचं नाव देणं योग्य ठरेल,” असं म्हणालेत.

खेलरत्न पुरस्कार काय आहे?

१९९१-१९९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली होती. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे हा पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू ठरले होते. याशिवाय आतापर्यंत टेनिसपटू लिअँडर पेस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, हॉकीपटू धनराज पिल्ले, बॅडमिंटनपटू पुलेला गोपिचंद, नेमबाज अभिनव बिंद्रा, अ‍ॅथलेट अंजू बॉबी जॉर्ज, बॉक्सिंगपटू मेरी कोम, क्रिकेट रोहीत शर्मा, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. या पुरस्कारासोबत २५ लाखांचे रोख बक्षीस देण्यात येतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bharat ratna for major dhyan chand trends after pm modi announce khel ratna award will hereby be called the major dhyan chand khel ratna award scsg