भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या पाच सनई चोरीला गेल्या आहेत. या पाचही सनई चांदीच्या आहेत. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचे पुत्र काजिम हुसैन यांच्या वाराणसी येथील चाहमामा-दालमंडीमधील घरातून सनई चोरीला गेल्या आहेत. मोहरमच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी उस्ताद बिस्मिल्ला खां यांच्याकडून वाजवल्या जाणाऱ्या सनईचादेखील चोरी झालेल्या पाच सनईंमध्ये समावेश आहे. याशिवाय पुरस्कार स्वरुपात मिळालेली चांदीची तबके आणि लाखो रुपयांचे दागिनेदेखील चोराने लंपास केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिस्मिल्लाह खान यांचे पुत्र काजिम हुसैन यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी काजिम यांना अश्रू अनावर झाले होते. ‘चोरीला गेलेल्या सनई आणि इतर वस्तू उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या आठवणींचा खजिना होता. त्या वस्तू म्हणजे उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचा अमूल्य वारसा होता,’ असे काजिम यांनी म्हटले आहे. काजिम यांनी नुकताच दालमंडीमधील चाहमामामध्या नवे घर घेतले होते. या घरातील एका कपाटात उस्ताद यांच्या सर्व वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat ratna ustad bismillah khan silver clarinet
First published on: 05-12-2016 at 08:52 IST