भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. चंद्रशेखर स्वत:ला मागासलेले, दलित, गरीब आणि वंचितांचे नेते असल्याचं सांगतात. चंद्रशेखर यांनी निवडणूक जवळ आली असताना आधी बसपा आणि नंतर सपासोबत युती करण्याचा प्रयत्न केला, पण युती होऊ शकली नाही. शेवटी चंद्रशेखर यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि स्वतः गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास उतरले.

एबीपी गंगा न्यूज चॅनलच्या ‘कार में सरकार’ या कार्यक्रमात चंद्र शेखर यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हीही गरीब, दीन, दलित आणि मागासलेल्यांचे राजकारण करता मग तुम्ही मायावतींसोबत युती का केली नाही? तुम्ही एकत्र निवडणूक का नाही लढवली? उत्तर देताना चंद्रशेखर म्हणाले की, “जे लोक माझ्या समर्थनार्थ उभे आहेत, त्यांच्याशी मला यासंदर्भात बोलावे लागेल. मायावतींना भेटणं इतकं सोपं आहे, तर मग तुम्ही जाऊन त्यांची मुलाखत घ्या.”

चंद्रशेखर म्हणाले की, “मी खूप प्रयत्न केले, माझ्यापेक्षा कोणीही झुकणार नाही. दोन वर्षे मी सतत प्रयत्न केले. तरीही मी त्यांचा कोणीच लागत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तुम्ही किती प्रयत्न कराल पण तुमचे वडील म्हणत असतील की हा माझा मुलगा नाही तर मग तुम्ही काय करणार? मी स्वाभिमान आणि सन्मानाच्या विरोधात कोणतेही काम करत नाही. अखिलेश यादव यांच्याशी दोन तास बोललो, मात्र ते यालाही खोटे म्हणू शकतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रशेखर आझाद यांनी युतीबाबत निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांची भेट घेतली होती, पण जागावाटपाचा निर्णय झाला नाही आणि युती होऊ शकली नाही. यानंतर चंद्रशेखर भावूक झाले आणि म्हणाले की, “त्यांनी (अखिलेश यादव) त्यांना लहान भाऊ मानून पाठिंबा मागितला असता तर मी त्यांना पाठिंबा दिला असता, पण स्वाभिमान आणि सन्मानाच्या विरोधात जाऊन मी राजकारण करू शकत नाही.”