‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या भारतीय इंजिनिअर्सना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातून मोठ्या ऑफर्स

कोविडच्या उद्रेकानंतर आता जगभरात कामाची ही नवी पद्धत रुजू पाहत आहे.

भारतीय टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्स जे सध्याच्या करोनाच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. त्यांना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातील इतर कंपन्यांकडून कामाच्या अनेक ऑफर येत आहेत. कोविडच्या उद्रेकानंतर आता जगभरात कामाची ही नवी पद्धत रुजू पाहत आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, जगभरातील अनेक कंपन्या भारतातील हायप्रोफाईल टेक्निकल टॅलेंटच्या शोधात आहेत. करोनाचा काळ सुरु होण्यापूर्वी या प्रोफेशनल्सना जेवढी मागणी होती त्यापेक्षा दोन ते तीन टक्के जास्त मागणी सध्या या लोकांना मिळत आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं आहे.

या हायप्रोफाईल टेकीजना अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मध्य आशियातील Instahyre, Interviewbit, Rocket, Techfynder, CIEL HR Services and Pesto Tech यांसारख्या कंपन्या कामावर रुजू करुन घेण्यास उत्सुक आहेत.

इन्स्टाहायरचे सहसंस्थापक सरबोजित मलिक बिझनेस लाईनशी बोलताना म्हणाले, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत कंपन्या नवी भरती करण्यास उत्सुक नव्हत्या. त्यांचा व्यवसाय थंड पडला होता. मात्र, त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या काळात भरती प्रक्रियेत वाढ झाली आहे. इन्स्टाहायर सध्या ८,७०० कंपन्यांसोबत काम करत आहे. गेल्या वर्षी हा आकडा ५,३०० इतका होता. त्याचबरोबर कंपनीचा महसूलही तीन ते चार टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये बहुतकरुन त्यांचे क्लायन्ट्स हे अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील आहेत.

अमेरिकेत नोकरीनिमित्त जाण्यासाठी H-1B व्हिसा आवश्यक आहे पण त्याला वेळ लागत असल्याने घरुनच काम करताना रिमोट पद्धतीने काम करण्यावर परदेशातील कंपन्या भर देत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे टॅलेंटेड प्रोफेशनल्स आहेत त्यांना हे रिमोट वर्कच्या कमाचा सध्या ट्रेन्ड आला आहे. अमेरिकेतील रॉकेट कंपनीचे सहसंस्थापक अभिनव अगरवाल यांनी ही माहिती दिली.

युके आणि आयरलंड येथून फेब्रुवारीपासून निवडक टेकीजसाठी २० टक्के मागणी वाढली आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांत टेकफाईंडरने शंभर भारतीयांना परदेशी कंपन्यांची काम मिळवून दिली आहेत. यामध्ये पेस्टो टेक भारतीय इंजिनियर्सना रिमोट वर्कसाठी संधी देत आहे. अमेरिकेतील स्टार्टअप्स हायलाईटर, क्लिपबोर्ड हेल्थ, पुली आणि स्नॉर्कल हे अनेक डेव्हलर्पसना घेत आहेत, अशी माहिती आयुष जैसवाल यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big offers from around the world for remote work to indian engineers who are work from home aau

ताज्या बातम्या