पीटीआय, रायपूर

छत्तीगड राज्यनिर्मिती २००० मध्ये झाल्यानंतर आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय भाजपने यंदा मिळवला आहे. बहुसंख्य जनमत चाचण्यांनी काँग्रेस नेते व मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे सरकार पुन्हा येईल असे भाकित वर्तवले होते. मात्र सत्ताविरोधी सुप्त लाटेचा अंदाज कोणालाही आला नाही. भाजपने पाच वर्षांनंतर पुन्हा सत्ता मिळवली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

सरळ लढतीत भाजपला ४६.३६ टक्के तर काँग्रेसला ४२.१४ टक्के मते मिळाली. बहुजन समाज पक्षाला २.१० टक्के तर अन्य पक्षांना ५.४६ टक्के मिळाली. भाजपच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांभाळत विजय मिळवून दिला. भूपेश बघेल तसेच टी.एस.सिंहदेव यांच्यातील वाद काँग्रेसला भोवला. सिंहदेव यांची काँग्रेसश्रेष्ठींनी समजूत काढली. बघेल यांची सारी भिस्त कल्याणकारी योजनांवर होती. १.७५ लाख कोटी रुपये या योजनांवर खर्च केल्याचा काँग्रेसचा दावा होता. तर भाजपने यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. प्रचारातही भाजप नेत्यांनी बघेल यांना लक्ष्य केले. त्यांचे बहुसंख्य मंत्री निवडणूकीत पराभूत झाले. यावरून सत्ताविरोधीलाट किती तीव्र होती याची कल्पना येते. छत्तीसगडमध्ये भाजपला यश मिळत असताना, केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते पराभूत झाले. कुलस्ते यांच्यासह तीन केंद्रीय मंत्र्यांना भाजपने रिंगणात उतरवले होते.

हेही वाचा >>>Chhattisgarh Election : भाजपाकडून छत्तीसगडमध्ये सत्तापालट, पाहा कोणते एग्झिट पोल खरे ठरले?

पाटण मतदारसंघातून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजप उमेदवार खासदार विजय बघेल यांचा पराभव केला. सुरुवातीला विजय यांनी आघाडी घेतली होती. मात्र नंतर भूपेश यांनी मोठा विजय मिळवला. गेल्या निवडणुकीतील पराभवानंतर भाजपचे मनोधैर्य खचले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपला धक्का बसला होता. मात्र प्रचारात मुख्यमंत्री बघेल यांच्यावर आरोप झाले तेथेच निकाल फिरल्याचे मानले जाते.

महादेव बेटिंग अ‍ॅपचा फटका

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरोधात महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणावरून आरोप झाले. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचे ते एक प्रमुख कारण ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात बघेल यांना लक्ष्य केले होते. मुख्यमंत्र्यांना किती पैसे मिळाले, श्रेष्ठींना किती पोचवलेत असा सवालच त्यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाला या प्रकरणात तुरुंगाची हवा खावी लागली. ईडीकडून याची चौकशी सुरू आहे. या अ‍ॅपच्या मालकांनी मुख्यमंत्र्यांना ५०८ कोटी रुपये दिल्याचा तपास संस्थांचा दावा आहे.

रमणसिंह की अन्य कोण?

छत्तीसगडमध्ये पुन्हा भाजपची सत्ता आल्याने

७१ वर्षीय रमणसिंह यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा येणार का? हा मुद्दा आहे.

(छत्तीसगडमध्ये भाजपने विजय मिळवल्यावर जगदलपूर येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.)

Story img Loader