राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांनी बिहारमध्ये नितीश कुमार आणि एनडीए सरकारचे “विसर्जन” करणार असल्याचे म्हटल्यानंतर, आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“काँग्रेसची आघाडी म्हणजे काय?, डिपॉझिट जप्त करण्यासाठी….” ; असं म्हणत लालूंचा काँग्रेसवर निशाणा!

“ते मला गोळ्या घालू शकतात. ते आणखी काही करू शकत नाही. त्यांना हवं असेल तर ते मला गोळ्या घालू शकता.” असं नितीश कुमार मिश्किलपणे माध्यमांना म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, नुकतेच बिहारला परतलेल्या लालू प्रसाद यादव यांनी, ते आगामी दोन विधानसभा पोटनिवडणुकांसाठी प्रचार करणार आहेत आणि नितीश कुमार आणि राज्यातील सत्ताधारी एनडीएचे “विसर्जन” सुनिश्चित करतील. असं विधान केलं होतं. यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माध्यमांना वरील प्रतिक्रिया दिली आहे.