बिहार राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी बुधवारी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “मनुस्मृतू, रामचरितमानस आणि बंच ऑफ थॉट्स सारखे ग्रंथ जाळून टाकले पाहीजेत. या ग्रंथानी द्वेष पसरविण्याचे काम केले आहे. लोकांना अनेक पिढ्या मागे रेटण्याचे काम केले.”, असे वक्तव्य केल्यानंतर आता बिहार आणि देशभरातील हिंदू संघटनांकडून त्यांचा विरोध करण्यात येत आरहे. अयोध्यामधील संत जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी तर चंद्रशेखर यांची जीभ छाटण्यासाठी दहा कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी बुधवारी नालंदा येथील मुक्त विद्यापीठाच्या १५ व्या दीक्षांत समारभांत बोलत असताना सदर वक्तव्य केले. ते म्हणाले, “देशातल्या जातींनी समाज जोडण्याचे नाही तर तोडण्याचे काम केले आहे. याममध्ये प्रामुख्याने मनुस्मृती, गोस्वामी तुलसीदास रचित रामचरितमानस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक माधव गोळवलकर लिखित बंच ऑफ थॉट्स या पुस्तकांनी ८५ टक्के लोकांना अनेक पिढ्या मागे नेण्याचे काम केले.”

तसेच ते पुढे म्हणाले, “या ग्रंथामुळे देशाचे राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांना मंदिरांमध्येही जाण्यापासून रोखले गेले. हे ग्रंथ द्वेषाची पेरणी करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाचा विरोध केला. त्यांनी मनुस्मृतीला जाळण्याचे काम केले. तसेच रामचरितमानस या ग्रंथावर देखील डॉ. आंबेडकरांनी टीका केली आहे. शिक्षणाचा अधिकार मिळाल्यानंतर खालच्या जातीतील लोक विषारी होतात. एका युगात मनुस्मृती, दुसऱ्या युगात रामचरितमानस तथा तिसऱ्या युगात बंच ऑफ थॉट्सने समाजात फक्त द्वेषच पसरविला. कोणताही देश द्वेषाने नाही तर प्रेमाने महान बनू शकतो.”

चंद्रशेखर यांची जीभ छाटणाऱ्यास १० कोटींचे बक्षीस

मंत्री चंद्रशेखर यांच्या वक्तव्यानंतर अयोध्यामधील संत जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रशेखर यांच्या वक्तव्यामुळे समस्त देशातील हिंदूच्या भावनांना तडा गेला आहे. हा सनातन्यांचा अपमान आहे. या वक्तव्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहीजे. तसेच एका आठवड्याच्या आत त्यांनी माफी न मागितल्यास त्यांची जीभ छाटणाऱ्याला आम्ही १० कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा करु, असे आवाहन परमहंस आचार्य यांनी केले.

भाजपाकडूनही या वक्तव्याचा निषेध

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजादा पुनावाला यांनी देखील ट्विट करत या वक्तव्याचा निषेध केला. बिहारचे शिक्षण मंत्री रामचरितमानस ग्रंथाला द्वेष पसरविणारा ग्रंथ म्हणतात. काही दिवसांपूर्वीच जगदानंद सिंह यांनी राम जन्मभूमीला द्वेषाची जमीन म्हटले होते. हा योगायोग नाही का? हे सर्व मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरु आहे. “हिंदू आस्था पर करो चोट, ताकी मिले वोट, सिमी और पीएफआई की पैरवी, हिंदू आस्था पर चोट” अशा भाषेत आपला राग व्यक्त करत कारवाई कधी होणार, असा प्रश्न पुनावला यांनी विचारला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar education minister chandrashekhar controversial statement about ramcharitmanas manusmruti kvg
First published on: 12-01-2023 at 12:31 IST