कॅलिफोर्निया राज्याने राज्यातील जातभेद नष्ट करण्यासाठीचं विधेयक मंजूर केलं आहे. या विधेयकाचं रुपांतर जर कायद्यात करण्यात आलं तर अशा प्रकारचा कायदा करणारं हे जगातलं पहिलं राज्य ठरेल. कॅलिफोर्निया राज्याच्या सिनेटने सीनेटर आयशा वहाब यांनी हे अँटी कास्ट बिल एसबी मंजूर केलं आहे. सदनात झालेल्या मतदान या विधेयकाच्या बाजूने ३४ मतं पडली आहेत तर विधेयकाच्या विरोधात एक मत पडलं आहे. या विधेयकावर राज्यपालांनी सही केल्यानंतर या विधेयकांचं रुपांतर कायद्यात होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विधेयकात काय तरतुदी आहेत?

कॅलिफोर्नियाच्या सीनेटर आइशा वहाब यांनी सादर केलेल्या विधेयकात जातीभेद नष्ट करण्याची महत्त्वाची तरतूद आहे. तसंच सगळ्या लोकांना समान निवास व्यवस्था, शिक्षण आणि तंत्रज्ञानात यातील सर्व व्यवस्था समान मिळतील यांचीही तरतूद आहे.
अमेरिकी सीनेटमध्ये अँटी कास्ट बिल पास झाल्यानंतर कॅलिफोर्निया हे असं पाऊल उचलणारं अमेरिकेतलं पहिलं राज्य ठरलं आहे. या विधेयकाचं रुपांतर जर राज्यपालांच्या सहीनंतर कायद्यामध्ये करण्यात आलं तर कॅलिफोर्नियात जातीभेद करणं हा गुन्हा ठरु शकणार आहे आणि जर कुणी असं केलं तर त्या व्यक्तीला मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bill to outlaw discrimination based on caste clears california senate scj
First published on: 12-05-2023 at 10:09 IST