जन्म – २८ जुलै १९५४
१९७१ ते १९७५ – व्हेनेझुएला अ‍ॅकॅडमी ऑफ मिलिटरी सायन्स मध्ये प्रवेश. त्यावेळी लष्करात परिवर्तनाचे वारे वाहात होते. देशप्रेमी अधिकाऱ्यांनी लष्करातील प्रत्येकाला उत्तम नागरिक म्हणूनही घडविण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी सर्वच क्षेत्रांचे ज्ञान त्यांना यावे आणि शारीरिक व मानसिकदृष्टय़ा त्यांची जडणघडण व्हावी म्हणून बरेच उपक्रम सुरू झाले होते. त्यातून चावेझ यांचे व्यक्तिमत्त्व बहरले. याच काळात समाजातील गरिबीने ते अस्वस्थ झाले.
१९७६ ते १९८१- लष्करात नेमणूक. मार्क्‍सवादी व लेनिनवादी बंडखोरांच्या कारवाया मोडून काढण्याच्या मोहिमेसाठी बारिनास येथे संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक. प्रत्यक्षात बंडाचा बीमोड आधीच झाल्याने फावला वेळ बराच मिळाला. त्यात बेसबॉल, लेखन व वाचन जोपासले. एकदा मार्क्‍स व लेनिनवादी पुस्तके हाती लागली. ती वाचून डाव्या विचारांकडे आकृष्ट.
१९७७ – लष्करात असतानाच ‘रेड फ्लॅग पार्टी’चे आंदोलन मोडून काढण्याची मोहीम. मात्र लष्कराच्या हेतूंबाबत मनात शंका. सरकारी भ्रष्टाचाराबाबत उघड टीका सुरू केली. एक ना एक दिवस व्हेनेझुएलात डाव्या विचारांचे सरकार स्थापन करण्याचा संकल्प. त्यासाठी समविचारी मित्रांसह लष्करातच ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ स्थापन.
१९८१- लष्करात कॅप्टन पदी. ज्या अ‍ॅकॅडमीत शिकले तेथेच प्रशिक्षक म्हणून नेमणूक. मात्र त्यांच्या डाव्या विचारांच्या कार्याचीही वरिष्ठांना कुणकुण.
१९८८- मेजरपदी पदोन्नती.
१९९२ ते १९९८- राजकीय उदय. डाव्या विचारांची मोर्चेबांधणी. सरकारशी उघड विरोध आणि तुरुंगवास.
१९९९- व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदी आरूढ.