अमित शहा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर, शनिवारी भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. ११ उपाध्यक्ष आणि ८ महासचिवांचा समावेश असणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अनेक तरूण चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विनय सहस्त्रबुद्धे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून श्याम जाजू आणि पुनम महाजन यांना सचिवपद देण्यात आले आहे. तर विजया रहाटकर यांच्याकडे महाराष्ट्रातील महिला मोर्च्याचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर जे पी नड्डा, संघाचे प्रवक्ते राम माधव आणि भाजपचे बिहारमधील प्रभारी राजीवप्रताप रूडी यांची सरचिटणीसपदासाठी निवड करण्यात आली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि मुख्तार अब्बास नक्वी यांना उपाध्यक्षपद देण्यात आले असले तरी, यापूर्वी सरचिटणीस पदावर असणाऱ्या वरूण गांधी यांना कार्यकारिणीतून वगळण्यात आले आहे.
उपाध्यक्ष – बंगारू दत्तात्रेय, बी. एस. येडियुरप्पा, सत्यपाल मलिक, मुख्तार अब्बास नक्वी, पुरुषोत्तम रुपाला, प्रभात झा, रघुवर दास, किरण माहेश्वरी, विनय सहस्त्रबुद्धे, रेणु देवी, दिनेश शर्मा
महासचिव – जगत प्रकाश नड्डा, राजीव प्रताप रुडी, मुरलीधर राव, राम माधव, सरोज पांडे, भुपेंद्र यादव, राम शंकर कठोरीया, राम लाल