भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीत गेल्या आठवड्यात १९ मार्च रोजी हा प्रकार घडला असून त्याचं सीसीटीव्ही फूटेजही पोलिसांच्या हाती लागलं आहे. यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पत्नीची कार चोरीला गेल्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

ही कार ड्रायव्हरच्या ताब्यात असताना चोरीला गेल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, जे. पी. नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा यांच्या नावावर या कारची हिमाचल प्रदेशमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. फॉर्च्युनर कंपनीची ही कार त्यांचा चालक जोगिंदर सिंग गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगसाठी घेऊन गेला होता. तिथून परत आल्यानंतर दिल्लीच्या गोविंदपुरी भागातील आपल्या घरी जेवणासाठी तो गेला. यावेळी कार त्याच्याकडेच होती. तिथूनच ही कार चोरीला गेल्याचं निष्पन्न झालं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp president j p nadda wife car stolen from delhi police searching cctv footage pmw
First published on: 25-03-2024 at 10:24 IST