या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआय, नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या संबंधात केलेल्या विधानांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी त्यांच्या विरोधात  निदर्शने केली. या वेळी त्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेरच्या मालमत्तेची मोडतोड केली. यामुळे या दोन पक्षांमधील शाब्दिक युद्ध पुन्हा तीव्र झाले आहे.

आम आदमी पक्षाला निवडणुकीत हरवण्यास भाजप असमर्थ असल्यामुळे केजरीवाल यांची हत्या करण्यासाठी भाजपने हे कारस्थान आखले होते, असा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. याचा प्रतिवाद करताना, ‘आप’ नाटक रचत असून, विस्थापित काश्मिरी पंडितांची थट्टा करणाऱ्या केजरीवाल यांच्या विधानाविरुद्ध जनतेचा संताप उफाळून आल्यामुळे ते ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळत आहेत असा आरोप भाजपने केला.

 या घटनेच्या संबंधात अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून, दोषींच्या अटकेसाठी पथके रवाना करणअयात आली असल्याचे पोलीस उपायुक्त सागर सिंग कलसी यांनी सांगितले. भाजयुमोच्या कार्यकत्र्यंनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आणि सुरक्षा अडथळय़ांची पोलिसांच्या उपस्थितीत मोडतोड केली, असा आरोप सिसोदिया यांनी केला. या लोकांनी घराच्या मुख्य द्वारावर रंगही फेकला. ‘दि काश्मीर फाईल्स’ या अलीकेडच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात केजरीवाल यांनी केलेल्या विधानांच्या विरोधात भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार तेजस्वी सूर्या यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक निदर्शने करत होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp protests against kejriwal breaking objects outside residence ysh
First published on: 31-03-2022 at 01:14 IST