महेश सरलष्कर, लोकसत्ता

नवी दिल्ली: भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काही मंत्र्यांचे राजकीय आयुष्य पणाला लावले आहे. त्यातील काही मंत्री तर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान मोदी म्हणतात, भाजपला ३७० जागा जिंकायच्या आहेत, आता तुमचीही मैदानात उतरवण्याची वेळ झाली!.. आत्तापर्यंत कधीही लोकसभेची निवडणूक न लढलेले मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांपैकी एक आहेत राजीव चंद्रशेखर. ते पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक जिंकली तर ते ‘जायंट किलर’ ठरतील. सत्ता मिळाली तर मोदी त्यांना बक्षीस म्हणून केंद्रीय मंत्री करू शकतील. पराभव पदरी आला तर मोदींचा विश्वास पुन्हा मिळवून राज्यसभेच्या सदस्यत्वाची वाट पाहावी लागेल वा राजकारणाला रामराम ठोकावा लागेल.

Loksabha Election 2024 Bhupesh Baghel Narendra Modi Gandhi-Nehru family Chhattisgarh
गोमांस विकणाऱ्यांच्या पैशांतून भाजपाचे झेंडे… – काँग्रेसचा आरोप
Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
Giriraj Singh interview issue of Kashi Mathura and Ayodhya Lok Sabha Election 2024
काशी, मथुरा व अयोध्येचा मुद्दा काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रलंबित; गिरीराज सिंह यांचा आरोप
bjp royal family members ticket
Video: ‘घराणेशाही’वरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भाजपाकडून राजघराण्यांतील १० सदस्यांना लोकसभेची उमेदवारी

हेही वाचा >>> लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “मी तर…”

चंद्रशेखर यांच्यासमोर दुहेरी आव्हान असेल. त्यांना मोदींनी थेट केरळमध्ये थिरुवंनंतपूरमला काँग्रेसचे अजातशत्रू शशी थरूर यांचा पराभव करण्यासाठी पाठवलेले आहे! केरळमध्ये भाजपने लोकसभेत एकही जागा जिंकलेली नाही. चंद्रशेखर विजयी झाले तर केरळमधून लोकसभेत गेलेले चंद्रशेखर भाजपचे पहिले खासदार ठरतील.  थरूर सलग तीनवेळा थिरुवनंतपूरममधून खासदार झालेले आहेत, मतदारांसाठी ते घरचे आहेत. थरूर फर्डे इंग्रजी बोलत असले तरी मल्याळीही त्यांना बोलता येते आणि लोकांमध्ये जाऊन काम कसे करायचे हेही ते शिकले आहेत.

हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024 : ५४३ जागा असताना ५४४ जागांसाठी निवडणूक जाहीर, एक मतदारसंघ वाढला? नेमकं गणित काय?

चंद्रशेखर यांनी आजतगायत लोकांमध्ये जाऊन काम राजकीय केलेले नाही. त्यांची राजकीय कारकीर्द राज्यसभेत गेलेली आहे. आपल्याला कधी लोकसभा निवडणूक लढावी लागेल असेही चंद्रशेखर यांना वाटले नसेल. राज्यसभेतील खासदार-मंत्र्यांना मोदींनी खरेतर बळेबळे लोकसभेच्या मैदानात उतरवले असावे असे चंद्रशेखर यांच्याकडे बघून वाटू शकते. भाजपचे नेते राजीव चंद्रशेखर हरहुन्नरी आहेत. तसे नसते तर त्यांनी ‘बीपीएल’ मोबाइल सेवाकंपनी सुरू केली नसती. काळाच्या ओघात ती बंद करून वित्तीय कंपनी काढली. ते पक्के उद्योजक आहेत. एका वृत्तवाहिनीच्या कंपनीमध्ये त्यांनी पैसे गुंतवले होते. मंत्री झाल्यावर बहुधा या कंपनीतून भाजपने त्यांना बाहेर पडण्यास सांगितले असावे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर विषयातील ते जाणकार आहेत. मोदींनाही या विषयात विशेष रस आहे. चंद्रशेखर यांच्या ‘हायटेक’ ज्ञानाचा वापर मोदींनी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासासाठी करून घेतला आहे. मोदींचा चंद्रशेखर यांच्यावर विश्वास असला तरी चंद्रशेखर मोदींचे वा भाजपचे आंधळे भक्त नाहीत. त्यांना हिंदूत्वाचा अतिरेक पसंत नाही. भाजपचे ‘मध्ययुगीन’ विचारांपासून ते लांब राहतात. पंतप्रधान म्हणून मोदी मंत्र्यांच्या कौशल्यांचा उपयोग करून घेतात, त्यांना मोकळीक देतात, असे त्यांचे म्हणणे असते. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयातील राज्यमंत्री या नात्याने राजीव चंद्रशेखर बोलके मंत्री ठरले आहेत.