दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनातील नेते आणि भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते गुरनाम सिंग चदुनी यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चदुनी यांनी संयुक्त संघर्ष पार्टी (Sanyukt Sangharsh Party) या पक्षाची स्थापना केली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची माहिती दिली. त्यांचा हा नवा राजकीय पक्ष आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व ११७ जागा लढणार आहे. असं असलं तरी ते स्वतः पंजाब विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

गुरनाम सिंग चदुनी म्हणाले, “राजकारण भ्रष्ट झालं आहे. हे बदलायला हवं. आमचा उद्देश राजकारणाची शुद्धता करणे आणि चांगल्या लोकांना पुढे आणणे हा आहे. सध्याचे राजकीय नेते भांडवलदारांना प्रोत्साहन देत आहेत आणि भांडवलादारांच्या हिताचीच धोरणं तयार करतात. यावेळी ते गरीबांच्या हिताकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच आम्ही या पक्षाची घोषणा करत आहोत. संयुक्त संघर्ष पार्टी एक धर्मनिरपेक्ष (Secular) पक्ष असेल. हा पक्षा समाजातील सर्वांच्या कल्याणासाठी काम करेन.”

हेही वाचा : “..मग भले त्यासाठी १५ वर्ष लागली तरी चालतील”, राहुल गांधींनी दिला मोदी सरकारला इशारा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरनाम सिंग चदुनी हे वर्षभरापेक्षा अधिक काळ चाललेल्या दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणात लोकांना एकत्र करण्यात मोठी भूमिका निभावली होती. या शेतकरी आंदोलनाला यश येऊन नोव्हेंबरमध्ये हे कृषी कायदे मागे घेण्यात आले.