केप कॅनाव्हरल : अमेरिकेतील ‘नासा’चे विविध प्रयोग साहित्य घेऊन ‘फायरफ्लाय एअरोस्पेस’ कंपनीचे ‘ब्लू घोस्ट’ हे अवकाशयान चंद्रावर रविवारी यशस्वीपणे उतरले. ‘ब्लू घोस्ट हे चंद्रावर उतरणारे पहिले खासगी आणि केवळ दुसरे व्यावसायिक यान आहे. अवकाश क्षेत्रामध्ये व्यावसायिक शोधामध्ये मोठी झेप म्हणून या प्रयोगाकडे पाहिले जात आहे.

फ्लोरिडा येथून १५ जानेवारीला ‘ब्लू घोस्टचे प्रक्षेपण करण्यात आले. ते चंद्रावरील कक्षेतून स्वयंचलित तंत्राद्वारे ते चंद्रावर यशस्वीपणे (सॉफ्ट लँडिंग) उतरले. लँडर यशस्वीपणे चंद्रावर उतरल्याची ‘फायरफ्लाय एअरोस्पेस’च्या टेक्सास येथील नियंत्रक कक्षाकडून पुष्टी करण्यात आली. ‘ब्लू घोस्ट’च्या प्रक्षेपणासाठी १०.१ कोटी डॉलर तर, यानातील तंत्रज्ञानासाठी ४.४ कोटी डॉलर खर्च आला.

चंद्रावर अवकाशयान यशस्वीपणे उतरवणारी ‘फायरफ्लाय’ ही पहिली खासगी कंपनी ठरली आहे. पृथ्वीवरून दिसणारे चंद्रावरील प्रचंड मोठ्या विवरांचा शोध घेणे हा या मोहिमेचा हेतू आहे. नासा आणि खासगी कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमांपैकी अगदी अलिकडील उपक्रम म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे.

‘फायरफ्लाय’चे मुख्य अभियंता विल कूगन यांनी माहिती दिली की, चंद्रावर उभे आणि अतिशय स्थिरतेने यान उतरले. चंद्रावर अवकाशयान यशस्वीपणे उतरवणारी ‘फायरफ्लाय’ ही पहिली खासगी कंपनी ठरली. आतापर्यंत रशिया, अमेरिका, चीन, भारत आणि जपानने चंद्रावर अवकाशयान सुरळीतरीत्या उतरविले आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी दोन मोहिमांकडे लक्ष

‘फायरफ्लाय’खेरीज आणखी दोन कंपन्याही अवकाशयान आकाशात पाठविणार आहेत. ‘इंट्यूटिव्ह मशीन’चे एक यान असून, येत्या गुरुवारी ते चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. जपानची कंपनी ‘आयस्पेस’चे यान आणखी तीन महिन्यांनी चंद्रावर उतरेल.